महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Border Dispute : सीमावाद चिघळला; कर्नाटकात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला, चेक पोस्टवर कडक पोलीस बंदोबस्त - चेक पोस्टवर कडक पोलीस बंदोबस्त

महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकचा प्रस्तावित दौरा रद्द करूनही राज्याच्या बेळगावी जिल्ह्याच्या सीमेवर तणाव कायम आहे.महाराष्ट्र राज्यातून बेळगावी जाणाऱ्या सर्व प्रवेश मार्गांवरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई येत्या काही दिवसांत कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. ( Kannada Activists Disallowed Entry )

border dispute
सीमा वाद

By

Published : Dec 6, 2022, 1:46 PM IST

Updated : Dec 6, 2022, 5:15 PM IST

कर्नाटक :कन्नड रक्षण वेदिकेकडून महाराष्ट्राच्या वाहनावर बेळगावच्या हिरबागेवाडी टोलनाक्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक वाद पुन्हा पेटला आहे. पोलिसांचा सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त आहे.

Border Dispute

पोलिस बंदोबस्त तैनात: महाराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेने बेळगावच्या चन्नम्मा सर्कलमध्ये रॅली काढली होती. मात्र, राज्यातील विविध जिल्ह्यातून येणाऱ्या कन्नड कार्यकर्त्यांना प्रवेश रोखण्यासाठी हिरेबागेवाडी चेकपोस्टवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कन्नड कार्यकर्त्यांचा प्रवेश रोखण्यासाठी दोन DCP, दोन ACP, चार CPI, 10 PSI, कर्नाटक राज्य राखीव पोलिस (KSRP) च्या 12 प्लाटून आणि सिटी सशस्त्र राखीव (CAR) च्या आठ प्लाटून चेक पोस्टवर तैनात आहेत. महाराष्ट्र राज्यातून बेळगावी जाणाऱ्या सर्व प्रवेश मार्गांवरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई येत्या काही दिवसांत कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.( Kannada Activists Disallowed Entry )

Border Dispute

परवानगी दिली जाणार नाही: या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कर्नाटक रक्षा वेदिकेचे अध्यक्ष टी.ए. नारायण गौडा यांनी मंगळवारी सांगितले की ते हजारो कन्नड कार्यकर्त्यांसह बेळगावीला जात आहेत. फक्त आजच नाही तर भविष्यात कधीही, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात पाऊल ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर जिल्हा प्रशासन त्यांना प्रवेश रोखण्यात अपयशी ठरले तर आम्ही त्यांना रोखू. महाराष्ट्र एकीकरण समिती अ(एमईएस) आणि शिवसेना अनेक वर्षांपासून निवेदने देत आहेत. काहीही झाले तरी त्यांना राज्याच्या हद्दीत जाऊ दिले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

कन्नड रक्षण वेदिकेकडून महाराष्ट्राच्या वाहनावर हल्ला

या घटनेचा निषेध: महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे कर्नाटकात कोणी स्वागत करत नाही. ते कन्नड आणि मराठी भाषिक लोकांमध्ये तेढ निर्माण करतील. ते दहशतवाद्यांसारखे वागत आहेत आणि कर्नाटकात कायदा आणि सुव्यवस्थेचे संकट निर्माण करत आहेत. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा निषेध करून आपली भूमिका कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दोषींंवर योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले.

सीमावाद चिघळला, महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक:महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमावादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत असतानाच आता पुन्हा याचा भडका उडण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या कर्नाटक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. पुणे बंगलोर महामार्गावर ही दगडफेक झाली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील शिवसैनिक सुद्धा आता या संतप्त प्रकरणानंतर आक्रमक होत असून आम्ही जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे गट आक्रमक: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. बेळगावात मंगळवारी सकाळी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले चढवले. बऱ्याच वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर मराठी भाषिकांनी संताप व्यक्त केला होता. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनी या घटनेचा निषेध केला होता. बेळगावातील या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटले आहेत. कन्नड रक्षण वेदिकेविरोधात उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पुण्यात कर्नाटकच्या चार बसेसना काळे फासले आहे. स्वारगेट येथील लक्ष्मी नारायण चौकात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या बसना कार्यकर्त्यांनी काळे फासून बेळगावच्या घटनेचा निषेध नोंदवला.

Last Updated : Dec 6, 2022, 5:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details