महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

MES Maha Melava: बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा.. महासंचालकांनी घेतली दोन्हीकडच्या नेत्यांची बैठक, म्हणाले.. - एडीजीपी बैठक मएस आणि कर्नाटकवादी संघटना

MES Maha Melava: बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीसह कर्नाटक समर्थक संघटनांसोबत बैठक ADGP Alok Kumar घेतली. यात शांतता भंग होऊ नये म्हणून दोन्ही बाजूंना समज देण्यात आली आहे. ADGP Meeting MES and Pro Kannada Organizations

Maharashtra Karnatak Border Row ADGP Alok Kumar Hold Meeting with Maharashtra Ekikaran Samiti And Pro Kannada Organizations Regarding MES Maha Melava
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा.. पोलीस महासंचालकांनी घेतली दोन्हीकडच्या नेत्यांची बैठक, म्हणाले..

By

Published : Dec 24, 2022, 1:26 PM IST

बेळगाव (कर्नाटक): MES Maha Melava: कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाच्या Maharashtra Karnatak Border Row पार्श्वभूमीवर एडीजीपी आलोक कुमार यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड समर्थक नेत्यांची बैठक ADGP Alok Kumar घेतली. आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली बेळगावातील टिळकवाडी पोलीस ठाण्यात शांतता बैठक ADGP Meeting MES and Pro Kannada Organizations झाली.

कर्नाटक रक्षा वेदिकेच्या नारायणगौडा गटाचे राज्य समन्वयक महादेव तलवार, जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी, शिवरामेगौडा गटाचे जिल्हाध्यक्ष वाजीद हिरेकूडी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर, एमईएस नेते प्रकाश मरगळे, विकास कलघटगी यांच्यासह अनेकजण या बैठकीत सहभागी झाले होते.

या बैठकीत त्यांनी बेळगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याची विनंती केली. याशिवाय हुबळी आणि धारवाडपेक्षा बेळगावचा विकास झपाट्याने व्हायला हवा होता. पण तुमच्या भांडणामुळे बेळगावचा विकास खुंटत चालला आहे. कृपया राज्योत्सवाचा दिवस काळा दिवस म्हणून करू नका, असे ते म्हणाले. आलोक कुमार यांनी एमईएस नेत्यांना बेळगाव अधिवेशनादरम्यान महामेळावा न घेण्याचा आणि सीमा वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत शांतता राखण्याचा सल्ला दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details