मसूरी (उत्तराखंड) -आज (शुक्रवारी) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथील एका कार्यक्रमात सहभाग घेतला. यानंतर ते शहरातील हॉटेल सवॉय येथे पोहोचले. यादरम्यान रैणी गावातील समस्या ही दुर्भाग्यपूर्ण असल्याचे ते म्हणाले. लाल बहादुर शास्त्री अकादमी येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा मसूरी दौरा. याठिकाणी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत भेट घेत अनेक विषयांवर चर्चा केली. जवळपास तिथे ते एक तास होते. यानतंर त्यांनी मसुरीतील सवॉय हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमत त्यांनी सहभाग नोंदवला. तिथे त्यांनी रैणी गावातील समस्य दु:खद असल्याचे सांगितले. ते म्हणाले, देवभुमीत देवांचा वास आहे. जसे देवांसोबत दैत्यांचा संघर्ष होत होता, याचप्रकारे देवभूमीचा सामना नैसर्गिक समस्यांसोबत होत असतो.
हेही वाचा -सर्वांची विमाने उतरतील अशी धावपट्टी तयार करायची आहे - मुख्यमंत्री
लाल बहादुर शास्त्री अकादमीत संबोधन -
येथील अकादमीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले, अकादमीचे गीत प्रेरणादायी आहे. मसूरीचे वातावरण पवित्र आहे. अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपापल्या क्षेत्रात सक्रिय होऊन कार्य करावे. मी अनेक आएएस अधिकाऱ्यांसोबत कार्य केले आहे. त्यांच्या अनुभवाचा देशाला आणि समाजाला लाभ झाला आहे. मात्र, काही अधिकाऱ्यांमध्ये कुठे ना कुठेतरी अभिमान दिसतो, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. जे लोक अंहकारातून मुक्त असतात. ते समाजात पुजण्या योग्य होतात. म्हणून, अधिकाऱ्यांनी आपल्या अभिमानाला दुर ठेवून देशासाठी कार्य करावे, असेही ते म्हणाले.
राज्यपालांच्या हस्ते अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रे राज्यपालांच्या हस्ते अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रे -
अकादमीत भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नतीने निवड झालेल्या देशभरातील अधिकाऱ्यांच्या १२२ व्या आरंभिक प्रशिक्षण शिबिराचा समारोप राज्यपालांच्या हस्ते झाला. यावेळी अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. एकूण १४ राज्यांमधून ५९ प्रशासकीय अधिकारी यावेळी सहभागी झाले होते. अकादमीचे संचालक संजीव चोपडा, प्रशिक्षण शिबीर समन्वयक विद्या भूषण, हे देखील यावेळी उपस्थित होते.