महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Border Dispute : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावात 'महामेळावा' आयोजित करण्याची महाराष्ट्र एकीकरण समितीची योजना - बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra ekikaran samiti) महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना महामेळाव्याला येण्याचे निमंत्रण दिले आहे. एमईएसने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. त्यांनी प्रत्येक पक्षाचे दोन नेते पाठवण्याची विनंती केली आहे. (MES to organize Mahamelava in Belgaon).

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 9, 2022, 6:16 PM IST

बेळगाव : कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादाचे प्रकरण (Maharashtra Karnataka Border dispute) सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. बेळगाव येथील सुवर्णसौधा येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच दिवशी, महाराष्ट्र एकीकरण समिती (Maharashtra ekikaran samiti) (MES) बेळगावमध्ये महामेळावा (मराठी संमेलन) आयोजित करण्याची तयारी करत आहे. एमईएसने बेळगावचे जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा आयोजित करण्याची परवानगी मागितली आहे.(MES to organize Mahamelava in Belgaon).

महाराष्ट्र एकीकरण समितीचे निवेदन

मराठी भाषिकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा विवाद प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात लवकरच सुरू होणार आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या बेळगावच्या सीमेवर काही दिवसांपूर्वी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसेसवर शाई लावण्यात आली. तर कर्नाटकात महाराष्ट्राच्या वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशी परिस्थिती असताना आता विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महामेळावा घेण्याचे नियोजन एमईएसने केले आहे. कर्नाटकात काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या आधी, मराठी भाषिकांना आपल्या बाजूने घेण्यासाठी एमईएस ही युक्ती करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना निमंत्रण : एमईएसने महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनाही महामेळाव्याला येण्याचे निमंत्रण दिले आहे. एमईएसने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. त्यांनी प्रत्येक पक्षाचे दोन नेते पाठवण्याची विनंती केली आहे. एमईएसने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सीमा प्रभारी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनाही आमंत्रित केल्याची माहिती आहे.

बस वाहतूक पूर्वपदावर :कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील परिस्थिती शुक्रवारी नियंत्रणात आल्यानंतर कर्नाटकहून महाराष्ट्राकडे जाणारी बस वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. कर्नाटकच्या चिक्कोडी उपविभागातून महाराष्ट्रात 200 बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. कर्नाटकातून बससेवा सुरू झाली असली तरी महाराष्ट्र परिवहन विभागाकडून कर्नाटकला जाणारी बससेवा अद्याप सुरू झालेली नाही. कर्नाटकातून कागवाड, निपाणी मार्गे बस वाहतूक सुरू झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details