महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Aaditya Thackeray Ayodhya Visit : आदित्य ठाकरे अयोध्या दौरा; म्हणाले, 'आमची प्रभू रामावर विशेष श्रद्धा' - शरयूची केली सायंआरती

उत्तरप्रदेशात शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्यांनी स्वागत केले, त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे राष्ट्रीय राजकारणात जाणार आहोत. आमची प्रभू रामावर विशेष श्रद्धा आहे. त्यामुळे रामलल्लाच्या दर्शनासाठी आलो आहोत, असे ते म्हणाले. बुधवारी आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद ( Aaditya Thackeray Ayodhya Press ) साधला.

Aaditya Thackeray Ayodhya Visit
आदित्य ठाकरे अयोध्या दौरा आरती

By

Published : Jun 15, 2022, 7:51 PM IST

Updated : Jun 16, 2022, 7:07 AM IST

अयोध्या (उत्तरप्रदेश) - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर ( Aaditya Thackeray Ayodhya visit ) केला. मुंबईवरून आदित्य ठाकरे हे विमानाने लखनऊ येथे पोहोचले होते. तेथे त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेथून ठाकरे हे अयोध्येत दाखल झाले. अयोध्येत पोहोचल्यानंतर त्यांनी राम मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद ( Aaditya Thackeray Ayodhya Press ) साधला.

यावेळी ते म्हणाले की, उत्तरप्रदेशात शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्यांनी स्वागत केले, त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे राष्ट्रीय राजकारणात जाणार आहोत. आमची प्रभू रामावर विशेष श्रद्धा आहे. त्यामुळे रामलल्लाच्या दर्शनासाठी आलो. महाराष्ट्रात आमचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी शपथ घेण्यापूर्वी आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता येणाऱ्या निवडणुकांपूर्वी दर्शनासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येत घेतले सर्वप्रथम इस्कॉन मंदिरात दर्शन - मंत्री आदित्य ठाकरे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास धर्माची नगरी अयोध्येत पोहोचले. अयोध्येला पोहोचल्यानंतर शहरातील रामनगर भागात असलेल्या इस्कॉन मंदिरात जाऊन तेथे दर्शन घेतले. रामलल्लाच्या दर्शनापूर्वी आदित्य ठाकरे यांनी इस्कॉन मंदिरात पूजा केली.

शिवसेनेने दिला होता मंदिर बांधण्याचा नारा - अयोध्येतील पूजेवरून होत असलेल्या राजकारणाच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, अयोध्या भारताच्या श्रद्धेशी संबंधित स्थळ आहे. प्रभू राम हे आपल्या श्रद्धेचे केंद्र आहे. 2018 मध्ये जेव्हा मंदिराचे बांधकाम सुरू झाले नव्हते. त्यावेळी आम्ही 'आधी मंदिर, मग सरकार' असा नारा दिला होता. यानंतर राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जात आहे.

शिवसेनेला शक्तीप्रदर्शनाची आवश्यकता नाही - पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, उत्तरप्रदेशात शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्यांनी स्वागत केले, त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. शिवसेनेना ही उत्तरदेशात शक्ती प्रदर्शनासाठी आलेली नाही, तर शिवसेनेची शक्ती आणि भक्ती या दोन्ही एकच आहेत. आमची भक्ती हीच शक्ती आहे. त्यामुळे आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची काही गरज नाही.

हनुमान मंदिर दर्शन -अयोध्या राम मंदिर परिसरात पत्रकार परिषद घेतल्यानंतर आदित्य ठाकरे हे येथील हनुमान गढी मंदिरात दर्शनासाठी गेले. तेथे त्यांनी हनुमान भगवंताचे दर्शन घेतले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी येथे हनुमान चालीसाचे पठण केले.

शरयू नदीच्या किनाऱ्यावर महाआरती - शरयू नदीच्या किनाऱ्यावर राम वसलेले असल्याचे मानले जाते. शरयू नदीची सायंकाळची आरती ही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाली.

हेही वाचा -Aaditya Thackeray In Ayodhya : उत्तर भारतीयांच्या प्रश्नांवर आदित्य ठाकरे म्हणाले, मी आमच्या बद्दल सांगू शकतो अन्य पक्षांबद्दल काय सांगू!

हेही वाचा -Aaditya Thackeray at Ayodhya : अयोद्धेत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी प्रयत्न करणार; आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

हेही वाचा -Navneet Rana : 'जेव्हा जेव्हा न्यायालय बोलणार, तेव्हा आम्ही प्रत्यक्षात हजर राहू' - नवनीत राणांना न्यायालयाचा दिलासा

Last Updated : Jun 16, 2022, 7:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details