महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Breaking News : खासदार संजय राऊत यांना ईडीची चौकशीसाठी नोटीस - मराठी ब्रेकिंग न्यूज

Maharashtra breaking news live updates crime politics Entertainment sports India World
आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

By

Published : Nov 16, 2022, 6:52 AM IST

Updated : Nov 16, 2022, 8:03 PM IST

20:01 November 16

खासदार संजय राऊत यांना ईडीची चौकशीसाठी नोटीस

मुंबई -खासदार संजय राऊत यांना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस. राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टातून जामीन देत असताना चौकशीसाठी व तपासासाठी सहकार्य करावे अशी अट घातली आहे. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणातील तपास ईडीने अजूनही पुढे सुरू ठेवला आहे. त्याच प्रकरणातील चौकशीसाठी पुन्हा संजय राऊत यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यासंबंधी नोटीस पाठवण्यात आली आहे. 18 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांना हजर राहण्यास सांगितले. आहे.

19:01 November 16

श्रद्धाच्या मारेकऱ्याला जाहीर फाशी द्यावी - संजय राऊत

मुंबई - श्रद्धाच्या मारेकऱ्याला जाहीर फाशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आमच्या महिलांनी सावध राहिले पाहिजे. लोक याला 'लव्ह जिहाद' किंवा काहीही म्हणतील. पण आमच्या स्त्रिया मरत आहेत. अशावेळी कायदा काहीही करू शकत नाही अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.

18:58 November 16

आंबेडकर स्मारक 2024 पर्यंत पूर्ण होईल - मुख्यमंत्री

मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळाची पाहणी केली. 2024 पर्यंत हे स्मारक पूर्ण होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

18:45 November 16

उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशी याचिकेवर 22 तारखेला सुनावणी

मुंबई - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची सीबीआय आणि ईडी द्वारे चौकशी करणारे याचिका हायकोर्टात दाखल आहे. उद्धव ठाकरे यांचे वकील जोएल कार्लोस यांनी याबाबत असे निदर्शनास आणले की याचिकाकर्त्याने फौजदारी जनहित याचिका नियमांचे पालन करून शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यानंतर या याचिकेवरील सुनावणी 22 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केलेली आहे.

18:33 November 16

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे निकम आणि उपाध्यक्षपदी भाजपचे पंकज कोरे बिनविरोध

पालघर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे प्रकाश निकम आणि उपाध्यक्षपदी भाजपचे पंकज कोरे यांची बिनविरोध निवड झाली.

18:12 November 16

हिंदुत्ववादी संघटनांकडून श्रध्दा वालकर हत्येच्या निषेधार्थ आक्रोश सभा

पुणे - हिंदुत्ववादी संघटनांकडून श्रध्दा वालकरची हत्या लव्ह जिहादमुळे झाल्याचा आरोप केला जात आहे. या हत्येच्या निषेधार्थ आक्रोश सभा आयोजित केली होती. दिल्ली येथे श्रद्धाचा लव्ह जिहादने बळी घेतला असून, आज दिल्लीत झाले ते उद्या पुण्यात घडू शकते अशी भीती व्यक्त करुन याकरिता हिंदूत्ववादी संघटनांकडून ही आक्रोश सभा घेण्यात आली.

17:16 November 16

गौतम नवलखा यांचा जामीन घेण्यासाठी अभिनेत्री सुहासिनी मुळे कोर्टात हजर

मुंबई - एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन घेण्याकरिता अभिनेत्री सुहासिनी मुळे कोर्टात हजर झाल्या. प्रख्यात अभिनेत्री सुहासिनी मुळे NIA कोर्टात दाखल. गौतम नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्याच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशावर मुंबईच्या NIA या मूळ कोर्टात अटी शर्ती पूर्तता सुनावणी सुरू. गौतम नवलखा यांना हमी देण्यासाठी सुहासिनी मुळे कोर्टात हजर.

16:45 November 16

डॉ. राणी बंग यांच्यावर नागपूरमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू, मुंबईला हलवणार

नागपूर - डॉ. राणी बंग यांच्यावर नागपूरमध्ये सिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या अतिदक्षता विभागात दाखल आहेत. त्यांच्यावर नागपूरमध्ये पुढील उपचार शक्य नसल्याने त्यांना मुंबईला हलवण्यात येणार आहे.

16:34 November 16

जोपर्यंत गजानन कीर्तीकर राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन - संजय निरुपम

मुंबई - जोपर्यंत गजानन कीर्तीकर राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे, असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी स्पष्ट केले आहे. ते वर्सोवा पोलीस स्टेशनबाहेर बोलत होते. आपल्याला बेकायदेशीररित्या पोलिस स्टेशनला पकडून आणले, असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे येथील एसीपीना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.

15:25 November 16

मेट्रो पॉलिस लॅबवर आयकर विभागाचा छापा

नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मधील मेट्रो पॉलिस लॅबमध्ये आयकर विभागाचा छापा पडला आहे. मागील तीन तासापासून आतमध्ये झाडाझडती सुरू आहे. आयकर विभागाचे अधिकारी आणि मुंबई पोलीस लॅबमध्ये तपासणी करत आहेत. पोलीस बाहेर उभे असून काहीच सांगण्यास तयार नाहीत. मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. मेट्रो पॉलिस लॅबच्या अनेक शाखा संपूर्ण देशाबाहेर आहेत. त्यामुळे ह्या रेडला खूप महत्व आहे.

14:49 November 16

जीआरपीचे पोलीस चरसची तस्करी करताना अटकेत

ठाणे - जीआरपीचे पोलीस कर्मचारी महेश वसेकर व रवी विशे यांना कल्याणमध्ये चरसची तस्करी करताना बाजारपेठ पोलिसांनी केली अटक. पोलीसच नशेचे सौदागर असल्याचे उघड झाल्याने पोलीस दलात खळबळ.

14:41 November 16

कुत्र्यांना औपचारिकपणे दत्तक घेण्यासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाच्या काही निरीक्षणांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने अंतरिम आदेशात, सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना औपचारिकपणे दत्तक घेण्यासाठी खायला घालण्यात स्वारस्य असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या काही निरीक्षणांना स्थगिती दिली आहे. न्यायालयाने नागपूर महापालिकेला, निश्‍चित केलेल्या ठिकाणी भटक्‍या कुत्र्यांना खायला घालण्यासाठी सर्वसामान्यांसाठी पावले उचलावीत, असे निर्देश दिले आहेत.

14:20 November 16

श्रद्धा हत्याप्रकरण - दिल्ली पोलिसांचा आफताबची सायको-असेसमेंट चाचणी घेण्याचा विचार

नवी दिल्ली -श्रद्धा हत्याकांड प्रकरणी दिल्ली पोलिस आफताबची सायको-असेसमेंट चाचणी घेण्याचा विचार करत आहेत. ज्या पद्धतीने हत्या करुन त्याने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, त्यावरुन त्याची विकृत मानसिकता दिसून येत आहे. त्यामुळे त्याची यासंदर्भात चाचणी पोलीस घेण्याची शक्यता आहे.

13:59 November 16

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पुन्हा एटीएस अधिकाऱ्या विरोधात जामीनपात्र वॉरंट

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पुन्हा एटीएस अधिकाऱ्या विरोधात जामीनपात्र वॉरंट. एटीएस अधिकारी दोनदा समन्स बजावूनसुद्धा हजर न झाल्याने विशेष NIA न्यायालयाने वॉरंट जारी केला. पाच हजाराचा दंड भरून वॉरंट रद्द करता येणार. संबंधित एटीएस अधिकारी या प्रकरणात मुख्य साक्षीदार आहे.

13:53 November 16

जबरदस्तीने वर्सोवा पोलीस स्टेशनला नेले - संजय निरुपम

मुंबई - काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा पोलिसांनी जबरदस्तीने पोलीस स्टेशनला नेल्याचे त्यांनी ट्विट करुन सांगितले आहे. पोलीस घरात घुसले. त्यांनी जबरदस्तीने वर्सोवा पोलीस स्टेशनला नेले असे निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आमचे स्थानिक खासदार जी कीर्तिकर यांच्या मतदारसंघातील त्यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव आणण्यासाठी मी बाईक रॅली काढली होती. आमचा शांततापूर्ण राजकीय कार्यक्रम पार पाडण्यास परवानगी देण्याऐवजी पोलिसांनी कोणताही आदेश न दाखवता मला जबरदस्तीने ताब्यात घेतले, असेही ट्विट निरुपम यांनी केले आहे.

13:49 November 16

पालघर - जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक बिनविरोध

पालघर - जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिंदे गटाचे प्रकाश निकम निवडले गेले. तर जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी भाजपाचे पंकज कोरे यांची निवड करण्यात आली.

13:37 November 16

गुन्हा सिद्ध करताना पोलिसांनाच नाकी नऊ येतील - जितेंद्र आव्हाड

ठाणे - राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काल विनायभंग प्रकरणात जामीन मिळाल्याने आव्हाड यांनी ठाणे न्यायालयात लावली हजेरी. जामीन प्रक्रियेची कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी आव्हाड यांनी लावली हजेरी. न्यायालयाने आव्हाड यांना जामीन देताना अटी शर्तींवर स्वाक्षरी करण्यासाठी आणि जामीनदाराला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आव्हाड आले होते ठाणे न्यायालयात. पोलिसांना हवे ते सहकार्य करेल आणि हा गुन्हा सिद्ध करताना पोलिसांनाच नाकी नऊ येतील जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया.

12:46 November 16

सुरत - आपचे उमेदवार कांचन जरीवाला यांचे अपहरण, उमेदवारी अर्ज घेतला मागे

सुरत - गुजरातमधील सुरत (पूर्व) येथील आम आदमी पक्षाचे उमेदवार, कांचन जरीवाला यांनी काल संध्याकाळी अपहरण झाल्याचा आरोप केला होता. आज त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी त्यांच्या या नेत्यावर दबाव टाकला जात असल्याचे आरोप केला आहे.

12:39 November 16

G20 अध्यक्षपद भारताला सुपूर्द

बाली - येथील जी 20 शिखर परिषदेच्या समारोप समारंभात इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी भारताला G20 अध्यक्षपद सुपूर्द केले. १ डिसेंबरपासून भारत अधिकृतपणे G20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे.

12:35 November 16

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर थोड्याच वेळात सुनावणी

मुंबई - महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर थोड्याच वेळात सुनावणी. शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची याचिका दाखल झाली आहे. त्यावर ही सुनावणी आहे.

12:15 November 16

पुसेसावळी मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

सातारा - फेरफाराची नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच घेताना पुसेसावळी येथील मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. धनंजय मधुकर भोसले (रा. काशीळ, ता. सातारा), असे त्याचे नाव आहे.

12:08 November 16

जॉन्सन अँड जॉन्सनला दिलासा नाहीच, बंदी 30 नोव्हेंबरपर्यंत कायम

मुंबई - जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दिलासा नाहीच. एफ डी ए नी घातलेली बंदी 30 नोव्हेंबरपर्यंत कायम. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने बेबी पावडरचे उत्पादन स्वत:च्या जोखमीवर सुरू करावे असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले आहे. एफडीए नी विक्री आणि वितरणावर घातलेली बंदी आदेशानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे. पावडरच्या नव्या नमुन्यांची तीन दिवसांत चाचणी करून आठवड्याभरात त्याचा अहवाल सादर करा, असे राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले.

12:06 November 16

विनायक मेटे यांच्या कारचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई - विनायक मेटे यांच्या कारचालकाविरुद्ध सीआयडीने रसायनी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मेटे यांचे अपघाती निधन झाले होते.

07:55 November 16

श्रद्धा हरवल्याची दिली होती तक्रार, आफताब आला होता दोनदा चौकशीसाठी

मुंबई - श्रद्धा खून प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी माणिकपूर येथे हरवल्याची तक्रार नोंदवली होती. नंतर आफताबला 3 नोव्हेंबरबरोबरच आणखी दोनदा चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी त्याने सांगितले होते की तो आणि श्रद्धा आता एकत्र राहात नाहीत. दुसरीकडे सध्या आफताबचे कुटुंब गायब आहे. माणिकपूर पोलिसांननी ही माहिती दिली.

07:14 November 16

जम्मू-काश्मीर: दहशतवादी संघटना TRF च्या 4 मदतनिसांना अटक

श्रीनगर पोलिसांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना टीआरएफच्या चार मदतनीसांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या दहशतवाद्यांचा श्रीनगरमधील ग्रेनेड हल्ल्यात हात होता. त्याच वेळी, टीआरएफ सक्रिय दहशतवाद्यांना लॉजिस्टिक सपोर्ट पुरवत असे. त्यांच्याकडून स्फोटके आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

06:39 November 16

Breaking News Live: जम्मू-काश्मीर: दहशतवादी संघटना TRF च्या 4 मदतनिसांना अटक

धुळे - धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या मयत पोलीस निरीक्षकाने लिहिलेल्या चिठ्ठीत कुणासही दोषी धरू नये असे लिहिले आहे.
धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात 2019 पासून प्रवीण विश्वनाथ कदम हे पोलीस निरीक्षक सेवेत होते.

Last Updated : Nov 16, 2022, 8:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details