महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Breaking News Live : न्यायालयाच्या निर्णयाचे प्रागतिक पक्षांकडून स्वागत - ब्रेकिंग न्यूज लेटेस्ट अपडेट्स मराठी

maharashtra breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Sep 23, 2022, 6:50 AM IST

Updated : Sep 23, 2022, 10:41 PM IST

16:14 September 23

न्यायालयाच्या निर्णयाचे प्रागतिक पक्षांकडून स्वागत


मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जनता दल, शेकाप यांच्यासह डाव्या पक्षांचा सहभाग असलेल्या प्रागतिक पक्षांच्या आघाडीने स्वागत केले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या निर्णयाचे एक नेता नव्हे तर राज्याचे प्रमुख म्हणून स्वागत करावे, असे आवाहन केले.


शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावा ही आज एक परंपरा बनली आहे. तसेच याच पक्षाने या मैदानावर मेळावा घेण्यास परवानगी देण्याची मागणी मुंबई महापालिकेकडे प्रथम केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शिवसेनेला परवानगी नाकारणे अन्यायकारक होते. परंतु, न्यायालयाच्या निर्णयाने ही चूक दुरूस्त झाली असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा. एस. व्ही. जाधव तसेच मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख वा एका गटाचे नेते म्हणून या प्रश्नाचा विचार न करता, ते आज राज्याचे प्रमुख आहेत. त्या भूमिकेतून हा निर्णय स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

16:14 September 23

16:00 September 23

सदा सरवणकरांची फेटाळली याचिका

मुंबई उच्च न्यायालयाने सरवणकरांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळाव्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.

13:16 September 23

दसरा मेळावा वाद न्यायालयात सुनावणी सुरू

दसरा मेळावा वाद न्यायालयात सुनावणी सुरू

कोर्ट - प्रथम कोणी अर्ज केला

Adv. चिनॉय - आम्ही 22 आणि 26 ऑगस्टला अर्ज केला, सरवणकर यांनी 30 ऑगस्टला अर्ज केला.

सरवणकर यांनी अर्ज नाकारला एवढेच ते सांगतात. तुमची कायदा आणि सुव्यवस्था एवढी खराब असेल तर ती तुमची समस्या नाही आमची आहे.

चिनॉय - मी रेकॉर्डवर पाहिलं तर दिलासा देण्यासाठी स्पष्ट केस आहे.

पोलिस अहवाल प्रतिस्पर्ध्याच्या दाव्यांवरून येतो. परिस्थितीबद्दल बोलत नाही, आमदारावर नियंत्रण ठेवता येत नाही? मी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करत नाही.

कोर्ट - तुमच्या विरोधात काही तक्रारी होत्या का?

चिनॉय - मला माहीत आहे असे नाही. मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. तक्रार दाखल करणारा एक आमदार इतक्या वर्षांची परंपरा चालू ठेवण्यापासून रोखू शकत नाही.

12:38 September 23

दांडियाक्वीन फाल्गुनीच्या दांडियाला हायकोर्टाचा हिरवा कंदील, विरोध करणारी याचिका फेटाळली

मुंबई : कांदिवलीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलाचा व्यावसायिक वापर होतोय, असे म्हणत दांडियाक्वीन फाल्गुनी पाठक यांच्या नवरात्रोत्सव आयोजनाला विरोध करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे फाल्गुनी पाठक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

12:16 September 23

मुंब्र्यात एआयएमआयएमच्या कार्यालयावर हल्ला घटना ; सीसीटीव्हीमध्ये कैद

ठाणे :मुंब्र्यातील AIMIM च्या पार्टी कार्यालयावर रात्री उशिरा काही अज्ञात हल्लेखोरांनी जोरदार हल्ला करत दोघाजणांना जबर मारहाण केली आहे. हातात लोखंडी रॉड घेऊन हल्ला करणाऱ्या या हल्लेखोरांचे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद (Attack on AIMIM office incident caught on CCTV) झाली. संपूर्ण मुंब्रा शहरांत तणावाचे वातावरण पसरले (Attack on AIMIM office in Mumbra) आहे.

12:16 September 23

भाजपचे विधानसभा मिशन ९८ ठरणार शिंदे गटासाठी डोकेदुःखी?

मुंबई :भाजपने महाराष्ट्रात लोकसभेसाठी मिशन ४५ ची घोषणा ( BJP Announced Mission 45 For Lok Sabha in Maharashtra ) केल्यानंतर आता विधानसभेसाठी मिशन ९८ ची घोषणा करण्यात आली आहे. विशेष करून भाजप यंदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत ( CM to Re Elect MLAs Belonging to Shinde Group ) आहे.

10:01 September 23

मुस्लिमांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने TISS ची केली नियुक्ती

मुंबई -समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यातील मुस्लिमांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने TISS (टाटा सामाजिक विज्ञान संस्था) ची नियुक्ती केली आहे; प्रकल्पासाठी 33.92 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

10:01 September 23

'महिलांच्या हळवेपणाचा फायदा घेणाऱ्यांना फाशी द्या' म्हणत विद्यार्थिनीची आत्महत्या

नांदेड - शहरापासून जवळच विष्णुपुरी येथील श्री गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील बीई मेकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील बामणी वाडा येथील गीता कल्याण कदम (22) या विद्यार्थिनीने बुधवारी (२१ सप्टेंबर) रात्री अभ्यासिका कक्षात गळफास घेऊन आत्महत्या ( Student committed suicide by hanging ) केली. मृत्यूपूर्वी गीताने चिठ्ठी लिहिली असून वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर तिने आराेप ( Student suicide note before death ) केले. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. Girl suicide due to blackmailing by classmate

10:01 September 23

मुख्यमंत्री आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट

मुंबई :राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या गाठीभेटी घेतल्या. काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Union Home Minister Amit Shah ) यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

09:32 September 23

न्यू एयरपोर्ट स्टेशन येथून सामना संपल्यानंतर रात्री १ वाजेपर्यंत मेट्रो सेवा

नागपूर - भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जामठा येथे होऊ घातलेला सामना बघण्या करता आलेल्या क्रिकेट प्रेमींकरता महामेट्रोने विशेष सोय केली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीनुसार, महा मेट्रोने न्यू एअरपोर्ट स्टेशन येथून मेट्रो गाड्या चालवण्याची व्यवस्था केली आहे. सामना संपल्यावर एक वाजे पर्यंत मेट्रो तर्फे गाड्या चालणार असून प्रेक्षकांना या माध्यमाने आपल्या गंतव्यावर पोचणे सुकर होणार आहे.

09:31 September 23

आई जादू करते म्हणत अल्पवयीन तरुणीचे प्रियकरासोबत पलायन, पोलिसांनी सुरू केला शोध

नागपूर -आईने काळी जादू केल्यामुळे प्रियकर आजारी पडला असा आरोप करत एका अल्पवयीन तरुणी प्रियकरासोबत घर सोडून गेली आहे. ही धक्कादायक घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अपहरणाचा गुन्ह नोंद करून तपास सुरू केला आहे.

08:40 September 23

धारावीत आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये राडा

मुंबई - दादरनंतर आता धारावीमध्ये देखील शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे. धारावीमध्ये शिंदे गटाकडून एक बैठक काल रात्री घेण्यात येत होती. या बैठकीला आमदार सदा सरवणकर देखील उपस्थित होते. त्या बैठकीच्या वेळीच शिवसैनिकांनी येऊन तिथे वाद घालायला सुरुवात केला असा आरोप आमदार सदा सरवणकर यांच्याकडून केला जातोय. हा वाद झाल्यामुळे आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे काही कार्यकर्ते यांनी धारावी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शिवसैनिकांचा विरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्यावर कलम 506 (2), 143, 145, 504 आणि 135 अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर याबाबतचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

07:53 September 23

शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा घुमणार? दसरा मेळाव्याबाबत आज सुनावणी

मुंबई - दसरा मेळाव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या (Dussehra melava shivaji park hearing 23 september) याचिकेवर उद्या ( शुक्रवारी ) सुनावणी होणार आहे. शिवसेनेकडून याचिकेत सुधारणा करण्यासाठी वेळ मागितला गेला असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

07:52 September 23

दापोलीतील साई रिसॉर्टच्या मालकाची मुंबई उच्च न्यायालयात धाव; सोमवारी होणार सुनावणी

मुंबई :दापोलीतील साई रिसॉर्टचे मालक सदानंद गंगाराम कदम ( Sadanand Gangaram Kadam Owner of Sai Resort ) यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या नोटिसेविरोधात तसेच रेस्टॉरंट पाडण्यासंदर्भात ( Petition Filed by Owner of Sai Resort in Bombay High Court ) दिलेल्या ( Petition has been Filed on Behalf of Notice ) आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. याचिकेत असे म्हटण्यात आले आहे की, सदर प्रकरण हे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

06:43 September 23

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा प्रेयसीच्या मदतीने पतीने सुपारी देऊन केला खून

नवी मुंबई - प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा प्रेयसीच्या मदतीने सुपारी देऊन पतीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर आढळला होता अनोळखी महिलेचा मृतदेह.

06:43 September 23

कुख्यात गुंडाने येरवडा कारागृहातून लोणंदच्या व्यापाऱ्याला मागितली ५० लाखांची खंडणी

सातारा - येरवडा कारगृहात असलेल्या कुख्यात गुंड परवेझ हनिफ शेख याने कारागृहातून पत्र पाठवून लोणंदमधील गॅस एजन्सी मालकाला ५० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परवेझ शेख याच्याविरूद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

06:35 September 23

MAHARASHTRA BREAKING NEWS : ब्रेकिंग न्यूज व लेटेस्ट अपडेट्ससाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला भेट द्या

बारामती - मी पक्षासाठी बारामतीमध्ये आले आहे. याचा पवार परिवाराशी काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

Last Updated : Sep 23, 2022, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details