सीकर -चिमूरचे भाजपा आमदार कीर्तिकुमार(बंटी) भांगडिया आणि सीकर शहर पोलीस यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती आहे. सीकरमधील पोलिसाने बस थांबवून कीर्तिकुमार यांच्या बस चालकाचा परवाना जप्त केल्यानंतर वाद वाढला. यावेळी डीएसपी सिटी बीरेंद्र कुमार यांनी आमदार कीर्तिकुमार यांच्यासह पाच जणांना अटक केली. मात्र, जामिनानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
कीर्तिकुमार(बंटी) भांगडिया हे कुटुंबासह बसने सालासर हनुमान दर्शनाला जात होते. दुपारी बाराच्या सुमारास बसचालक सीकरजवळ रस्ता भटकला आणि शहरात घुसला. शहरातील एसके हॉस्पिटलजवळ ट्रॅफिक महिला पोलीस कमला आणि हेड कॉन्स्टेबल गिरधारी सिंग यांनी बस थांबविली आणि 500 रुपयांचे चालान कापले. चालान कापल्यानंतर चालकाचा परवानाही ताब्यात घेण्यात आला. यावेळी बस चालक आणि शहर पोलीस यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी बस चालक परत न अल्याने आमदार बस खाली उतरले आणि स्व:ताची ओळख करून दिली. मात्र, त्याने वाद आणखीच वाढला आणि हाणामारी झाली.