उज्जैन मध्यप्रदेशउज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या दोन पुजाऱ्यांनी शनिवारी ऑनलाइन फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोने बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची जाहिरात करणारी जाहिरात मागे घेण्याची मागणी केली. कारण ती जाहिरात हिंदूंच्या भावना दुखावणारी आहे. जाहिरातीत ऋत्विक रोशन म्हणतो की, त्याला उज्जैनमध्ये भोजन करावेसे खावेसे वाटले म्हणून त्याने महाकाल वरून थाळी ऑर्डर केली Zomato ad featuring Hrithik . मात्र, यालाच मंदिर पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. zomato to withdraw offensive ad featuring hrithik महाकाल मंदिराच्या थाळीची झोमॅटोकडून थट्टा करण्यात आली असाही त्यांचा आरोप आहे.
उज्जैनमधील शिवाचे महाकालेश्वर किंवा महाकाल मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे जे देशभरातील भक्तांना आकर्षित करते. मंदिराचे पुजारी महेश आणि आशिष म्हणाले की, झोमॅटोने त्वरित जाहिरात मागे घ्यावी आणि माफी मागावी. भाविकांना थाळीवर प्रसाद दिला जातो आणि या जाहिरातीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहे, असा दावा त्यांनी केला. येते प्रसाद मोफत दिला जातो आणि झोमॅटोच्या जाहिरातीमुळे चुकीचा संदेश हिंदू भाविकांमध्ये जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.