नवी दिल्ली : माघ महिना (Magh Mass 2023) 7 जानेवारी 2023, शनिवार पासून म्हणजेच आजपासुन (Magh month 2023 starts from today) सुरू होत आहे, जो 5 फेब्रुवारी 2023 रोजी माघ पौर्णिमेसह समाप्त होईल. या दिवसापासून भाविक महिनाभर सूर्योदयापूर्वी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. जर ते शक्य नसेल तर, स्वतःच्या घरी शुद्ध पाण्याने स्नान करा. पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल घालुन आंघोळ करा. माघ महिन्यात नक्षत्रांच्या सावलीत स्नान केल्याने पूर्ण लाभ होतो. प्राचीन काळी राजे आणि सम्राटांसह लोक प्रयागराज किंवा हरिद्वार आणि बनारससारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये गंगेच्या तीरावर एक महिना घालवत असत.
मनोकामना पूर्ण करण्याचा मार्ग : माघ महिन्याबद्दल ज्योतिषाचार्य शिवकुमार शर्मा म्हणतात की, हिंदू धर्मग्रंथानुसार विविध प्रकारचे उपवास उत्सव साजरे केले जातात. कारण प्रत्येक मनुष्य तपश्चर्या करू शकत नाही. त्यामुळे सामान्य लोकही त्या तपस्याचा लाभ स्वतःमध्ये रुजवून घेऊ शकतात. त्यासाठी काही खास नियम करण्यात आले आहेत. जसे कडक उन्हात निर्जला एकादशीला पाणीही न घेणे, हीच कलियुगाची तपश्चर्या आहे. माघ महिन्यात कडाक्याच्या थंडीत पारा शून्याच्या आसपास असतो, तेव्हा सूर्योदयापूर्वी पहाटे थंड पाण्याने स्नान करणे हे तपस्या मानले जाते. परंतु सामान्य लोकांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी हे सर्वोत्तम साधन आहे.
कल्पवास म्हणजे काय : कल्पवास म्हणजे आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी पवित्र नद्यांच्या जवळ राहणे आणि तपश्चर्या करणे आणि त्यामध्ये नियमित सकाळी स्नान करणे, भगवान विष्णूची पूजा करणे, हे तपस्या करण्या सारखे आहे. उत्तर भारतात किंवा इतर तीर्थक्षेत्रात असताना मंडप उभारुन, सकाळी नियमित स्नान करणे आणि नित्यक्रम करणे आणि भगवान विष्णूची नित्य पूजा करणे हा एक सूक्ष्म तपश्चर्या आहे.