महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ludhiana Robbery : 10 कोटींच्या दरोड्याची मास्टरमाईंड मोनाला उत्तराखंडमधून अटक - Ludhiana Robbery MASTERMIND ARRESTED

10 जून रोजी पंजाबच्या लुधियानामध्ये एका एटीएम कॅश कंपनीमध्ये एकूण 10 कोटींचा दरोडा टाकण्यात आला होता. पंजाब पोलिसांनी या दरोड्याचा कट रचणाऱ्या मनदीप कौर उर्फ ​​मोनाला अटक केली आहे. यासोबतच पोलिसांनी तिच्या एका साथीदारालाही मोगा येथून अटक केली आहे.

Ludhiana Robbery MASTERMIND ARRESTED
लुधियाना दरोड्याच्या मास्टरमाइंडला अटक

By

Published : Jun 17, 2023, 6:15 PM IST

चंदीगड :लुधियाना जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या कॅश व्हॅन प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनदीप कौरला अखेर पोलिसांनी तिच्या पतीसह उत्तराखंडमधील एका धार्मिक स्थळावरून अटक केली आहे. मनदीप कौरने तिच्या साथीदारांसह एटीएम कॅश कंपनी सीएमएसमध्ये 8.5 कोटींचा दरोडा टाकला होता. पोलिसांनी या प्रकरणातील जवळपास सर्वच आरोपींना अटक केली होती. मात्र मनदीप उर्फ ​​मोना डाकू तिच्या पतीसह पोलिसांच्या तावडीतून सतत सुटत होती. आता या घटनेच्या मुख्य सूत्रधाराला अटक करून पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

मास्टरमाइंडला 100 तासांत अटक : डीजीपी गौरव यादव यांनी ट्विट करून ही माहिती दिली. 100 तासांत मास्टरमाइंडला पकडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लुधियाना पोलिसांच्या पथकाने काउंटर इंटेलिजन्सच्या मदतीने ही कारवाई केली आहे. या आधीही पोलिसांनी ट्विट करून फरार आरोपींना खुले आव्हान दिले होते. पोलिसांनी लिहिले होते की, जितके पळायचे आहे तितके पळा, तुम्हाला लवकरच पिंजऱ्यात उभे केले जाईल.

आरोपींना पकडण्यासाठी एक कोटी खर्च :लुधियानाचे पोलीस आयुक्त मनदीप सिद्धू यांनी सांगितले आहे की, आरोपींना पकडण्याच्या ऑपरेशनमध्ये एक कोटी रुपये खर्च झाले आहेत. या सोबतच कर्मचाऱ्यांना रकमेच्या शोधात सीवरेज लाईनमध्ये उतरावे लागले. आरोपींनी घटनेच्या दिवशी रात्री काही दिसू नये म्हणून काळे कपडे घालण्याची योजना आखली होती. कंपनीकडून खर्च वसूल करण्यासाठी डीजीपींशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरोड्यादरम्यान वापरलेली कार जप्त : मनदीप कौर ही मुळची लुधियाना जिल्ह्यातील आहे. ती लहानपणापासून तिच्या आजी - आजोबांसोबत राहते. ती दिल्लीला ये - जा करत असे. लुधियाना पोलिसांनी या प्रकरणात बर्नाला येथील एका तरुणाचेही नाव घेतले असून, त्याच्या घरातून दरोड्यादरम्यान वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

  1. Robbery In Ludhiana : लुधियानात 10 कोटी रुपयांचा दरोडा! दरोडेखोर कॅश व्हॅन घेऊन फरार
  2. Jeweler Robbery Case: हैदराबादच्या ज्वेलरला, अधिकारी असल्याचे सांगून लुटणाऱ्या राजस्थानी आरोपींना मुंबईत अटक
  3. Wine Shop Theft Case: डोंबिवलीत वाईन शाॅपच्या गल्ल्यातील ८ लाखाची रोकड पळविणाऱ्या तिघांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details