महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UP Crime News : पती सेक्स करु शकत नसल्याने पत्नीने गाठले पोलीस स्टेशन, गु्न्हा दाखल - woman alleges husband impotent

लखनऊच्या एका महिलेने पती नपुंसक असून तो उपचार घेण्यास तयार नसल्याची तक्रार दाखल केली आहे. महिलेने पतीच्या कुटुंबीयांवरही फसवणुकीचे आरोप केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (woman alleges husband impotent)

UP Crime News
महिलेचा पती नपुंसक असल्याचा आरोप

By

Published : Jul 17, 2023, 6:53 PM IST

लखनऊ :लखनऊच्याएका महिलेने तिच्या पतीवर एक अजब आरोप केला आहे.महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती लग्नानंतर शारीरिक संबंध स्थापित करण्यापासून दूर पळतो आहे. ही व्यक्ती सहा महिने त्याची नपुंसकता लपवत राहिली. यावर उपचार करून घेण्यास सांगितले असता तो तेही करून घेण्यास तयार नव्हता. आता महिलेने पती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम ४२० अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (woman alleges husband impotent)

महिलेने पतीवर उपचार करण्याचा निर्णय घेतला : लखनऊच्या कृष्णा नगर भागात राहणाऱ्या एका महिलेने हा एफआयआर दाखल केला आहे. या दोघांचे जानेवारी 2023 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर महिलेने तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र पती तिला सारखा नकार देत असे. काही काळानंतर महिलेने पतीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले असता पतीने तिला सांगितले की, तो सेक्स करण्यास असमर्थ आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, हे ऐकून तिला धक्काच बसला. आपले वैवाहिक जीवन वाचवण्यासाठी तिने तिच्या पतीवर उपचार करण्याचा निर्णय घेतला.

पतीने उपचार करून घेण्यास विरोध केला : महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने आपल्या पतीच्या नपुंसकतेचा उपचार करवून घेण्यासाठी शहरातील एका मोठ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संपर्क साधला. मात्र पतीने विविध कारणे सांगून डॉक्टरांना भेटण्यास नकार देण्यास सुरुवात केली. अनेकवेळा विनवणी केल्यानंतर तो डॉक्टरांकडे आला. मात्र त्याने काही चाचण्यांचे नमुने देण्यास साफ नकार दिला. त्याने हुंडा घेऊन फसवणूक केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. शारीरिक संबंध ठेवू न शकणाऱ्या व्यक्तीशी मुद्दामहून लग्न करवण्यात आल्याचा महिलेचा आरोप आहे .

पुढील तपास सुरू आहे : या प्रकरणी कृष्णनगर पोलिस स्टेशनचे प्रभारी विक्रम सिंह यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.

हे ही वाचा :

  1. Revenge Porn : आरोपी 8 वर्षांपर्यंत इंटरनेट वापरू शकणार नाही, रिव्हेंज पॉर्न प्रकरणात न्यायालयाचा आगळावेगळा निर्णय, जाणून घ्या सविस्तर
  2. Rape Case: चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला जन्मठेपेची शिक्षा; पीडितेच्या आईने न्यायालयासमोर केली पतीच्या सुटकेची मागणी
  3. Delhi Crime News : पतीच्या मृत्यूनंतर एकजण करत होता बलात्कार, महिलेने केले असे काही..

ABOUT THE AUTHOR

...view details