लखनौ : शाळेची फी जमा करण्यासाठी शिकवणी शिकवणाऱ्या १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेने सर्वच हैराण झाले (Lucknow girl student gangrape case)आहेत. पीडित मुलीवर ऑटो चालवणाऱ्या अत्याचारींनी ३ तास बलात्कार केला आणि तिच्या शरीरावर जखमाही केल्या. जिथे डीसीपी स्वतः एक महिला आहेत, अशा राजधानीच्या झोनमध्ये हा प्रकार घडला आहे.
नक्की काय घडले -इंटरमिजिएटमध्ये शिकणाऱ्या पीडितेने काही दिवसांपूर्वीच आपला १८ वा वाढदिवस साजरा केला होता, त्यानुसार १५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.४५ वाजता तिने कथौटा भागात घरी जाण्यासाठी ऑटो घेतला. हुसदिया चौकाजवळ आल्यानंतर चालकाने ऑटो शहीद पथाकडे नेला. यावर पीडितेने चालकाला चुकीच्या दिशेने जाण्यासाठी अडवले. त्यानंतर चालकाने कारण सांगुन रिक्षा पुढे नेला. काही अंतर चालून गेल्यावर तिला काही शंका आल्याने ती आवाज करू लागली. पहिल्यांदा दोघांनी तिला शिवीगाळ केली. दुसऱ्यांदा आवाज केल्यावर त्यांनी तिच्या डोक्यावर जड वस्तूने वार केले. यामुळे ती बेशुद्ध झाली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, दोन्ही आरोपींनी तिला ऑटोमध्ये सुशांत गोल्फ सिटीमधील प्लासिओ मॉलजवळील झुडपात नेले. तेथे दोघांनी तीन तास तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही, तर शरीरावर अनेक जखमाही केल्या. नंतर तिला हुसदिया चौकात फेकण्यात (lucknow girl gangrape case) आले.
पोलिसांचाही पीडितेला त्रास -पीडितेने सांगितले की - शुद्धीवर आल्यानंतर तिने तिच्या कुटुंबीयांना फोन केला. आणि 112 डायल करून मदत मागितल्यावर हवालदार तिला कथोटा येथे घेऊन गेले, आणि परत आले आणि तिला पुन्हा तिथे सोडले. त्यानंतर ती कशीतरी घरी पोहोचली. कुटुंबीयांनी तिला गोमतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत हुसदिया चौकात पोलीस बूथवर नेले. मात्र, घटनेचे ठिकाण विभूती खांडचे असल्याचे सांगून त्यांना तेथून परत पाठविले. पीडित तरुणी विभूती खांड पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली, तेव्हा तिला ही घटना सुशांत गोल्फ सिटी हद्दीतील असल्याचे सांगून परत पाठवण्यात आले. सुशांत गोल्फ सिटीमध्ये जाऊनही पीडितेची तक्रार दाखल झाली नाही.