लखनौ सुपरजायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ( KKR vs LSG ) एकतर्फी सामन्यात ७७ धावांनी पराभव केला. या शानदार विजयासह लखनौने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर, प्लेऑफसाठी पात्र होणे जवळपास निश्चित झाले आहे. 11 सामन्यांत 8 विजयांसह केएल एंड कंपनीचे 16 गुण आहेत. तर, दुसरीकडे, कोलकाताचा हा 11 सामन्यांमधला सातवा पराभव आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपरजायंट्सने यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक (50 धावा) आणि दीपक हुडा (41 धावा) यांच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांच्या भागीदारीनंतर सात बाद 176 धावा केल्या. ( KKR vs LSG IPL ) या धावसंख्येमध्ये (19)व्या षटकात 30 धावांनी केकेआरला सामन्यातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. केकेआरकडून आंद्रे रसेलने तीन षटकांत २२ धावा देत दोन बळी घेतले. सुनील नरेन आणि टीम साऊदीने एक विकेट घेतली.