नवी दिल्ली - लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lt Gen Manoj Pande) देशाचे नवे लष्करप्रमुख (New Army Chief:) होणार आहेत. त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. 30 एप्रिल रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्याकडे भारतीय लष्कराची कमान सोपवण्यात येणार आहे. मनोज पांडे हे देशातील पहिले अभियंता असतील, ज्यांच्याकडे लष्करप्रमुखाची कमान सोपवली जाईल. सध्याचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. मनोज मुकुंद नरवणे यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाच्या स्पर्धेत जनरल नरवणे हे आघाडीवर मानले जात आहेत. त्यामुळे नरवणे यांच्याकडे कोणता पदभार दिला जातो हे पाहणे महत्तवाचे असणार आहे. दरम्यान, आता लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्यासह नौदल प्रमुख आवि वायू दल प्रमुखे हे तिन्ही अधिकारी 61 व्या NDA तुकडीचे आहेत.
New Army Chief : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख होणार
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lt Gen Manoj Pande) देशाचे नवे लष्करप्रमुख (New Army Chief:) होणार आहेत. त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. 30 एप्रिल रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्याकडे भारतीय लष्कराची कमान सोपवण्यात येणार आहे. मनोज पांडे हे देशातील पहिले अभियंता असतील, ज्यांच्याकडे लष्करप्रमुखाची कमान सोपवली जाईल. सध्याचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. आता लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्यासह नौदल प्रमुख आवि वायू दल प्रमुखे हे तिन्ही अधिकारी 61 व्या NDA तुकडीचे आहेत.
मनोज पांडे यांची लष्करी कारकीर्द -लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारी सांभाळली होती.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांचा जन्म डॉ. सीजी पांडे आणि प्रेमा यांच्या घरी झाला, त्यांची आई ऑल इंडिया रेडिओच्या होस्ट होत्या. त्यांचे कुटुंब नागपूरचे आहे. शालेय शिक्षण झाल्यावर मनोज पांडे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत रुजू झाले. एनडीएनंतर, त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि अधिकारी म्हणून कमिशन घेतले. 3 मे 1987 रोजी शासकीय दंत महाविद्यालयाच्या सुवर्णपदक विजेत्या अर्चना सालपेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.