महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन : दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात

अधिवेशनाच्या या सत्राचा समारोप आठ एप्रिलला होणार आहे. मात्र तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे बरेच मोठे नेते प्रचारात व्यग्र असणार आहेत. हे लक्षात घेता सत्राचा कालावधी कमी करण्यात येऊ शकतो. याबाबत अधिकृत माहिती मात्र समोर आली नाही...

LS to resume Budget Session from Monday amid Oppn ruckus
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन : दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात

By

Published : Mar 8, 2021, 7:18 AM IST

नवी दिल्ली :संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र आजपासून सुरू होता आहे. मात्र, मार्च-एप्रिलमध्ये चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा विचार करता या सत्राचा कालावधी कमी करण्यात येण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या या सत्राचा समारोप आठ एप्रिलला होणार आहे. मात्र तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे बरेच मोठे नेते प्रचारात व्यग्र असणार आहेत. हे लक्षात घेता सत्राचा कालावधी कमी करण्यात येऊ शकतो. याबाबत अधिकृत माहिती मात्र समोर आली नाही.

दुसऱ्या सत्रामध्ये सरकार प्रामुख्याने अर्थसंकल्प आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीच्या अनुदानासंबंधी मागण्यांबाबत चर्चा करेल. यासोबतच काही विधेयकेही मंजूर करुन घेण्यावर सरकारचा भर असेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र २९ जानेवारीला सुरू झाले होते. यामध्ये एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.

हेही वाचा :'भाजपा देशात जातीयवाद पसरवत आहे'; शरद पवारांची रांचीमध्ये टीका

ABOUT THE AUTHOR

...view details