नवी दिल्ली -सर्वसामान्यांचे जगणे दिवसेंदिवस आणखी महाग होताना दिसत आहे. घरगुती एलपीजी गॅसच्या दरात आज बुधवारी 15 रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय इंधन दरात वाढ झाल्यामुळे गॅसचे दर वाढले.
घरगुती गॅसच्या दरात 15 रुपयांनी वाढ; जाणून घ्या, नवे दर
अनुदानित आणि विनाअनुदानित दोन्ही एलपीजीच्या किमती वाढवण्यात आल्याचे तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वयंपाकाच्या गॅसची किंमत आता दिल्लीमध्ये 899.50 रुपये प्रति सिलेंडर आहे. त्याचबरोबर पेट्रोलच्या दरात 30 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 35 पैशांनी वाढ झाली आहे.
अनुदानित आणि विनाअनुदानित दोन्ही एलपीजीच्या किमती वाढवण्यात आल्याचे तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वयंपाकाच्या गॅसची किंमत आता दिल्लीमध्ये 899.50 रुपये प्रति सिलेंडर आहे. त्याचबरोबर पेट्रोलच्या दरात 30 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 35 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल आता 102.94 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 91.42 रुपये प्रति लीटर आहे. दरम्यान, जागतिक बेंचमार्क ब्रेंटने प्रति बॅरल 82.53 डॉलर्स, तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट 78.87 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.
हेही वाचा -खासदार राहुल गांधी आज लखीमपुरला जाणार? योगी सरकारकडून जमाबंदी लागू