मुंबई - व्यावसायिक स्वयंपाकाचा गॅस (19 किलो) एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर 250 रुपयांनी वाढ झाली आहे. आता त्याची किंमत आजपासून 2253 रुपये होणार आहे. (LPG Cylinder price hiked) दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही नाही.
पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ - यामध्ये घरगुती वापराच्या एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. यापूर्वी मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली होती. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या दर आज स्थिर असले तरीही मागील १० दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे.
प्रतिलिटर सुमारे १२ ते २५ रुपयांपर्यंत वाढ - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०१.८१ रुपये झाला असून, डिझेलचा दर ९३.०७ रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ११६.७२ रुपये आणि डिझेलचा दर १००.९४ रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे १२ ते २५ रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.