नवी दिल्ली : ऑक्टोबरच्या सुरूवातीलाच गॅस दरवाढीचा फटका सामान्यांना बसला आहे. इंधन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 43.50 रुपयांनी वाढविले आहेत. त्यामुळे राजधानी नवी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1736.50 रुपये इतकी झाली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कसलिही वाढ करण्यात आलेली नाही.
दिल्लीत सिलिंडर 1736.50 रुपयांना
नव्या दरवाढीमुळे राजधानी नवी दिल्लीत 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1736.50 रुपये इतकी झाली आहे. आधी ही किंमत 1693 रुपये इतकी होती. कोलकात्यात याची किंमत 1805.50 रुपये इतकी झाली आहे. आधी ही किंमत 1770.50 रुपये इतकी होती. घरगुती वापराच्या 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचे दर मात्र स्थिर आहेत. दर पंधरा दिवसांनी इंधन कंपन्यांकडून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीची समीक्षा केली जाते.
घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर स्थिर