नवी दिल्ली : व्यावसायिकांना दिलासा देणारी बातमी गॅस कंपन्यांनी दिली असून व्यावसायिक गॅस दराच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. 1 जून 2023 रोजी गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 83.50 रुपयांची कपात केली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. गॅस कंपन्या दर महिन्याला एलपीजी सिलिंडरची किंमत ठरवतात. यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 172 रुपयांनी कमी करण्यात आली होती.
जाणून घ्या काय आहे तुमच्या शहरातील किंमत :भारतात पेट्रोलियम आणि तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या दरात कपात केल्याने, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील अनेक भागांमध्ये सिलेंडर स्वस्त होणार आहेत. आता दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १७७३ रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1103 रुपये आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत कोलकात्यात 1875.50 रुपये, मुंबईत 1725 रुपये आणि चेन्नईमध्ये 1973 रुपये असेल.
- जाणून घ्या देशातील प्रमुख शहरातील गॅसचे दर :पाटणामध्ये घरगुती गॅसची किंमत 1201 रुपये, कन्याकुमारी 1187 रुपये, अंदमान 1179 रुपये, रांची 1160.50 रुपये, डेहराडून 1122 रुपये, चेन्नई 1118.50 रुपये, आग्रा 1115.50 रुपये, चंदीगड 1112 रुपये, चंडीगढ 1112 रुपये, शिमला 1147.50 रुपये आणि लखनऊमध्ये 1140.50 रुपये प्रति सिलिंडर विकला जात आहे.