नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिलासा देणारी बातमी आली आहे. नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. नैसर्गिक वायूच्या किमती सतत गगनाला भिडत होत्या. हे सर्व असतानाही गॅस सिलिंडरचे दर ( LPG Cylinders rate today ) कमी करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात ही कपात करण्यात आली आहे.
राष्ट्रीय राजधानीत आजपासून 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर ( LPG cylinder became cheaper ) 115.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. याशिवाय अनेक शहरांमध्ये किमतीही कमी झाल्या आहेत. गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही ( commercial gas cylinder became cheaper ) कपात करण्यात आली होती. आजपासून एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर कमी होत असल्याचे पहायला मिळत आहे.