कर्नाल - मुख्यमंत्र्यांचं शहर असलेल्या कर्नालमध्ये गर्लफ्रेंडची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. (Murder In Karnal). हे खून प्रकरण सुमारे दोन महिने जुने आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी आरोपी प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ही बाब उघडकीस आली. (lover killed girlfriend in karnal). चौकशीत आरोपी प्रियकराने गुन्ह्याची कबुली दिली आहे. (girlfriend murdered in karnal). आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी नाल्यातून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
Lover Killed Girlfriend : प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या, मृतदेह फेकला नाल्यात - खुन करून मृतदेह फेकला नाल्यात
कर्नालमध्ये प्रियकराने प्रेयसी पासून सुटका करून घेण्यासाठी तिची हत्या केली (Murder In Karnal). त्यानंतर तिचा मृतदेह गोणीत टाकून नाल्यात फेकून दिला. पोलिसांच्या चौकशीत आरोपी प्रियकराने गुन्ह्याची कबुली दिली आहे. (lover killed girlfriend in karnal).
![Lover Killed Girlfriend : प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या, मृतदेह फेकला नाल्यात Lover Killed Girlfriend](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16958034-thumbnail-3x2-karnal.jpg)
दोन महिन्यांपुर्वीची घटना -कर्नालच्या न्यू प्रीतम नगरमध्ये राहणारी आशा वर्कर रेणू ही मूळची समलखा येथील होती. 2005 मध्ये तिचा विवाह न्यू प्रीतम नगर, कर्नाल येथे राहणारा परविंद्र याच्याशी झाला होता. दोन महिन्यांपूर्वी 19 सप्टेंबर रोजी रेणू मॉर्निंग ड्युटीसाठी तिच्या स्कूटीवरून घरून निघाली होती. रेणू आपल्या पतीला दहा वाजेपर्यंत परत येईल असे सांगून घरी गेली होती. मात्र, सायंकाळी पाचपर्यंतही ती घरी परतली नाही. यानंतर नातेवाईकांनी तीचा शोध सुरू केला. ती न सापडल्याने पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
नाल्यात आढळला मृतदेह - युपीमध्ये राहणाऱ्या एका आरोपीवर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी आरोपी रवींद्रलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रवींद्र हा कर्नाल येथे बराच काळ काम करत होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. रेणूचे रवींद्रसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आठ महिन्यांपूर्वी दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते, त्याचीही तक्रार पोलिसांत दिली होती. रेणू अजूनही त्याच्यावर प्रेम करत होती पण आता आरोपीला संबंध संपवायचे होते. यामुळे १९ सप्टेंबर रोजी आरोपीने प्रेयसीचा खून केला होता आणि तिचा मृतदेह गोणीत टाकून नाल्यात फेकून दिला. पोलिसांना रेणूचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. तपास अधिकारी नरेश कुमार यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या जबानीवरून आरोपी रवींद्रला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्याने सखोल चौकशीत मधुबनच्या काँक्रीट पुलाजवळ गोणीत मृतदेह ठेवल्याची कबुली दिली आहे. यानंतर पथक आरोपीसह घटनास्थळी पोहोचले आणि बुधवारी सायंकाळी उशिरा आशा वर्करचा मृतदेह गोणीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून पुढील कार्यवाही सुरू आहे.