महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Love Jihad : हिंदू असल्याचे सांगत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार.. गर्भवती झाल्यावर सत्य उजेडात.. अल्पवयीन बहिणीवरही अत्याचार - Simdega news

सिमडेगा येथे कथित लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले (love jihad in simdega ) आहे. या संदर्भात पीडितेने सिमडेगा महिला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने हिंदू असल्याचे सांगत तिच्याशी प्रेम केले आणि लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार ( man sexually assaulted girlfriend ) केला. त्यानंतर तिच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार (raped her minor sister ) केला आणि व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले.

LOVE JIHAD IN SIMDEGA A MAN SEXUALLY ASSAULTED GIRLFRIEND AND RAPED HER MINOR SISTER
हिंदू असल्याचे सांगत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार.. गर्भवती झाल्यावर सत्य उजेडात.. अल्पवयीन बहिणीवरही अत्याचार

By

Published : Jul 24, 2022, 3:49 PM IST

सिमडेगा ( झारखंड ): जिल्ह्यातून कथित लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले (love jihad in simdega ) आहे. जिथे हिंदू असल्याचे भासवून नईम मियाँ नावाच्या तरुणाने एका मुलीवर प्रेम केले आणि लग्नाच्या बहाण्याने तिचे लैंगिक शोषण ( man sexually assaulted girlfriend ) केले. एवढेच नाही तर आरोपी तरुणाने प्रेयसीच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कारही (raped her minor sister ) केला आणि त्याचा व्हिडिओ बनवून दोन्ही बहिणींना त्रास देण्यास सुरुवात केली. या कथित लव्ह जिहाद प्रकरणाबाबत पीडितेने न्यायाची याचना करत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

महिला पोलिस स्टेशन प्रभारी कविता मंडल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, टायपैटनगर पोलिस स्टेशन हद्दीतील मातारामेटा येथे राहणारा नईम मियाँ हा गेल्या पाच वर्षांपासून नाव बदलून एका हिंदू तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. यादरम्यान मुलगी गरोदर राहिली आणि तिने लग्नासाठी दबाव टाकला, तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. नईम मियाँने आपली खरी ओळख सांगून मुलीशी लग्न करण्यास नकार दिला.

हिंदू असल्याचे सांगत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार.. गर्भवती झाल्यावर सत्य उजेडात.. अल्पवयीन बहिणीवरही अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान नईम मियाँने त्याच्या प्रेयसीच्या लहान बहिणीलाही वासनेची शिकार बनवले आणि तिचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बडाईक आणि खासदार प्रतिनिधी सुशील श्रीवास्तव यांना या प्रकरणाची माहिती मिळताच दोघांनीही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत महिला पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, पोलीस आरोपीच्या शोधात छापेमारी करत असून तो लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल.

हेही वाचा :यूपीच्या बरेलीमध्ये आणखी एक लव्ह जिहाद? हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचे लग्न

ABOUT THE AUTHOR

...view details