भोपाळ - मध्य प्रदेश राज्यातील बैतूलमध्ये लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. नाव बदलून एका मुस्लिम व्यक्तीने विवाहित महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. चहामध्ये बेशुद्धीचे औषध टाकून तिच्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओही बनवला. यानंतर, तरुणाने महिलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, पतीपासून वेगळे होण्याचा आणि धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. अखेर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा आणि बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
चहामध्ये औषधे मिसळून बेशुद्ध केले -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहित महिलेची प्रवासादरम्यान बस चालक राजू उर्फ फिरोज खानशी ओळख झाली. फेब्रवारी महिन्यात महिला बैतुलला आल्यानंतर आरोपीने तिला चहा पाजला. चहामध्ये त्याने गुंगीचे औषध टाकले होते. चहा पिल्यानंतर ती बेशुद्ध झाली. जेव्हा तीला जाग आली. तेव्हा ती सोनाघाटीमधील एका घरात होती. जिथे आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी -
या प्रकाराबद्दल कोणाकडे वाच्यता केली, तर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून देईल, अशी धमकी त्याने महिलेला दिली. यानंतर त्याने ब्लॅकमेल करून महिलेवर अनेकदा बलात्कार केला. तसेच धर्मपरिवर्तन करण्याचा दबाव टाकला. एवढेच नाही, तर आरोपीने महिलेच्या पतीलाही पत्नीला सोडून देण्याची धमकी दिली होती. अखेर महिलेने आरोपीसोबतचे संपर्क संपवत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.
लव्ह जिहाद विरोधात कायदा -