महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Love Jihad Case : नोयडामध्ये लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस, आरोपीला अटक - Love Jihad Case

उत्तराखंडमधील अल्मोडा येथील एका तरुणीने सांगितले की, दादरी येथील रहिवासी हसीन सैफीने तिचे नाव बदलून तिच्यासोबत प्रेमप्रकरणाचे नाटक रचले. त्यानंतर त्याने तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले आणि जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ बनवून त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. लग्नाच्या अवघ्या एक दिवस आधी सत्य समोर आल्यावर त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. (Love Jihad case came in Noida)

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 12, 2022, 10:41 PM IST

नोयडामध्ये लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस

नवी दिल्ली :ग्रेटर नोएडातील दादरी पोलीस स्टेशन परिसरात एका विशिष्ट धर्माच्या तरुणाने आधी नाव बदलले आणि नंतर दुसऱ्या धर्माच्या मुलीला प्रेमप्रकरणात अडकवले. (muslim boy change name to marry hindu girl). त्यानंतर तिचा अश्लिल व्हिडिओ बनवून तिला लग्नासाठी भाग पाडले. लग्नाच्या एक दिवस आधी तिचे सत्य समोर आले. त्यानंतर पीडितेने दादरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Love Jihad case in Noida)

लग्नाच्या एक दिवस आधी सत्य समोर : दादरी पोलीस ठाण्याचे प्रभारी उमेश बहादूर सिंह यांनी सांगितले की, अल्मोडा, उत्तराखंड येथील एका मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत तिने सांगितले की दादरी मँगो रोड येथील रहिवासी हसीन सैफीने त्याचे नाव बदलून आशिष असे केले. (Haseen Saifi changed her name to Ashish). त्यानंतर त्याने तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले आणि जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ बनवून तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. लग्नाच्या एक दिवस आधी त्याचे सत्य मुलीसमोर आले. यानंतर तिने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तरुणी नोएडा येथे कामाला : एफआयआरनुसार, उत्तराखंडमधील तरुणी नोएडा येथील एका कंपनीत काम करत होती. आरोपी तरुणही दुसऱ्या कंपनीत काम करायचे. प्रवासादरम्यान दोघांची मैत्री झाली, ज्याचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. तरुणाने अश्लील व्हिडीओ बनवून तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने मुलीवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. आरोपीने मुलीला दादरी येथील एस्कॉर्ट कॉलनीत एक खोलीही मिळवून दिली. तो सोमवारी मुलीला दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी लग्न करणार होता.

आरोपीच्या वडीलांमुळे सत्य उघड : एफआयआरनुसार, आरोपी मुलीला दादरी मार्केटमध्ये खरेदीसाठी घेऊन गेला. त्याचवेळी आरोपी हसीन सैफीचे वडील शकील यांना कोणीतरी सांगितले की, तुमचा मुलगा एस्कॉर्ट कॉलनीत राहतो. यानंतर आरोपीचे वडील शकील एस्कॉर्ट कॉलनीत आले आणि लोकांना हसीनबद्दल विचारले. लोकांनी सांगितले की, आशिष ठाकूर येथे राहतो, हसीन नाही. मुलगी एस्कॉर्ट कॉलनीत परतली तेव्हा आसपासच्या लोकांनी तिला शकीलबद्दल सांगितले. शकीलचे म्हणणे ऐकल्यानंतर आशिष ठाकूर बनलेल्या हसीन सैफीचे सत्य समोर आले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details