महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

LORD RAM IDOL : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रामाची मूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षाही असेल उंच - TO BE TALLER THAN STATUE OF UNITY

गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या सरदार पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. त्याहीपेक्षा उंच (TO BE TALLER THAN STATUE OF UNITY) अशी 251 मीटर उंच भगवान रामाची मुर्ती (LORD RAM IDOL) अयोध्येत उभारण्यात (LORD RAM IDOL IN UPS AYODHYA) येणार असल्याची माहीती, प्रख्यात शिल्पकार आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते राम व्ही सुतार यांनी दिली.

LORD RAM IDOL
भगवान रामचंद्रांचा पुतळा

By

Published : Sep 20, 2022, 12:58 PM IST

अयोध्या : गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारणारे प्रख्यात शिल्पकार आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते, राम व्ही सुतार आता अयोध्येत (LORD RAM IDOL IN UPS AYODHYA) प्रभू रामाची मूर्ती (LORD RAM IDOL) तयार करणार आहेत, जी आधीपेक्षा उंच (TO BE TALLER THAN STATUE OF UNITY) असेल. सुतार हे आजकाल त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्यासोबत अयोध्येत आहेत. सध्या अयोध्येत स्वर्गीय गायिका लता मंगेशकर चौकाचे बांधकाम सुरु असल्याने, सुतार आणि त्यांचा मुलगा लता मंगेशकर यांची मुर्ती तयार करण्यात व्यस्त आहे.

मूर्ती बनवण्यासाठी लागणार दोन हजार कारागीर :सुतार म्हणाले की, अयोध्येत उभारण्यात येणारा रामाचा पुतळा 251 मीटर उंच, स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षा 69 मीटर उंच असेल. गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या सरदार पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. राम व्ही सुतार यांचा मुलगा अनिल सुतार यांनी सांगितले की, साहिबााबाद येथील त्यांच्या कार्यशाळेत रामाची मूर्ती तयार केली जाईल. रामाची मूर्ती बनवण्यासाठी सुमारे दोन हजार कारागीर लागतील, असे ते म्हणाले.

स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षा असणार 69 मीटर उंच : शिल्पकार मुंबईत उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 212 मीटर उंच पुतळा, बाबा साहेबांचा 137.2 मीटर उंच पुतळा आणि कर्नाटकात 46.6 मीटर उंच भगवान शिव मूर्तीच्या प्रकल्पावरही काम सुतार करत आहेत. सुतार म्हणाले की, अयोध्येत उभारण्यात येणारी रामाची मूर्ती 251 मीटर उंच, स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षा 69 मीटर उंच असेल. राम व्ही सुतार यांचा मुलगा अनिल सुतार यांनी सांगितले की, साहिबााबाद येथील त्यांच्या कार्यशाळेत रामाची मूर्ती बनवली जाईल. रामाची मूर्ती बनवण्यासाठी सुमारे दोन हजार कारागीर लागतील, असे ते म्हणाले. गुजरातमध्ये बांधण्यात आलेला सरदार पटेल यांचा पुतळा साडेतीन वर्षांत एक हजार कुशल कारागिरांनी बनवला.

मॉडेलला साठी जमीनीचा शोध घेणे सुरु :मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंजूर केलेल्या श्री रामाच्या मूर्तीच्या मॉडेलला साठी जमीन शोधणे सुरु आहे. जमिनीचा शोध पूर्ण होताच, या कार्याला गती मिळणार आहे. या मूर्तीचे मॉडेल 2018 मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर एका स्पर्धेत सादर करण्यात आले होते. त्याच्या बांधकामाला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. सध्या मूर्तीसाठी जमीन शोधण्याची प्रक्रिया सुरू होती. जागा उपलब्ध झाल्यानंतर सुमारे चार वर्षांत मूर्तीचे बांधकाम होणार आहे. राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल यांनी मूर्तीची रचना तयार केली आहे. LORD RAM IDOL

ABOUT THE AUTHOR

...view details