महाराष्ट्र

maharashtra

Lord Jagannath Holi : भगवान जगन्नाथ यांच्यावर चांदिच्या पिचकारीने उडविला रंग

By

Published : Mar 8, 2023, 6:13 PM IST

आज अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात पुष्प उत्सव आणि रंग उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रंगोत्सव आणि फुलोत्सवात गुलाब, सूर्यफूल अशा विविध फुलांची ५०० किलो आणि विविध रंगांची ५०० किलो ऑर्डर देण्यात आली होती. यावेळी भगवान जगन्नाथ यांच्यावर चांदिच्या पिचकारीने उडविण्यात आला.

Lord Jagannath Holi
भगवान जगन्नाथ होळी

प्रतिक्रिया देतांना जगन्नाथ मंदिरातील महंत

अहमदाबाद : आज देशभरात होळी-रंगपंचमीचा सण साजरा केला जात आहे. सर्वजण हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करत आहेत. ज्यामध्ये सर्व मंदिरांमध्ये परमेश्वराला वेगवेगळ्या रंगांनी रंगवले जात आहे. आज अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात पुष्प उत्सव आणि रंग उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भगवान जगन्नाथ यांच्यावर चांदिच्या पिचकारीने उडविण्यात आला.

भगवान जगन्नाथ होळी

विविध फुले आणि रंगांची 500 किलोची ऑर्डर :दरवर्षी भगवान जगन्नाथ यांचा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांना पारंपरिकरित्या चांदीच्या रंगाने रंगविले जाते. तर या वर्षीही भगवान जगन्नाथाला केशुदा रंगाने तसेच विविध रंग व फुलांनी मंदिराचे महंत दिलीपदासजी महाराज, मंदिराचे विश्वस्त महेंद्र झा व साधू संतो यांच्या हस्ते रंगविण्यात आले. या रंगोत्सव आणि फुलोत्सवात गुलाब, सूर्यफूल अशा विविध फुलांची ५०० किलो आणि विविध रंगांची ५०० किलो ऑर्डर देण्यात आली होती.

भगवान जगन्नाथ होळी

रंगोत्सव व फुलोत्सव साजरा : मंदिराचे महंत दिलीपदासजी महाराज म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान जगन्नाथ मंदिरात रंगोत्सव व फुलोत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये ऋषी-मुनींसह फुलांची रंगरंगोटी आणि केशुदाच्या पाण्याने रंगोत्सव साजरा करण्यात आला. प्रत्येक शहरातील नागरिकांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली.

भगवान जगन्नाथ होळी

नगर देवता जगन्नाथ : भगवान जगन्नाथ यांना नगर देवता असेही म्हणतात. नवीन वर्षातील आषाढी बीज आणि धुळेतिच्या दिवशी अहमदाबाद शहरातील लोक मोठ्या संख्येने येथे येतात. आजही धुलेतीच्या शुभ दिवशी अहमदाबाद शहराच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी गर्दी केली होती. रंगोत्सव साजरा होण्यापूर्वी, शहरवासी भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी नृत्य करतात आणि नंतर भगवान जगन्नाथ आणि ऋषी संतांसोबत फुलांच्या उत्सवात सहभागी होतात.

भगवान जगन्नाथ होळी

देशभऱ्यातील मंदिरात होळी साजरी :देशभऱ्यातील विविध मंदिरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात होळी साजरी केली जाते. फुले आणि गुलालाची उधळण करित भाविक मोठ्या उत्साहात या दिऴशी एकत्र जमतात. होळी साजरी करण्याची प्रत्येक मंदिरातील प्रथा वेगवेगळी असते, त्याुनसार देवाला भोग देखील दाखविला जातो.

हेही वाचा : Saints Holi in Haridwar : हरिद्वार मधील साधू-संतांची होळी

ABOUT THE AUTHOR

...view details