महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Amritpal Singh Case: अमृतपाल सिंग विरोधात लुक आऊट सर्कुलर आणि अजामीनपात्र वॉरंट जारी - खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग

अमृतपाल सिंगचा पळून गेल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पंजाबचे आयजी सुखचैन सिंग गिल यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, अमृतपाल सिंग ज्या कारमधून पळून गेला होता, ती कार जप्त करण्यात आली आहे. यासोबतच त्याच्याविरुद्ध लुक आऊट सर्कुलर आणि अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Amritpal Singh Case
अमृतपाल सिंग

By

Published : Mar 22, 2023, 11:01 AM IST

चंदीगड : पंजाब पोलिसांनी फरार खलिस्तान समर्थक 'वारीस पंजाब दे' प्रमुख अमृतपाल सिंगविरुद्ध लुक आउट सर्कुलर आणि अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना पंजाबचे पोलीस महानिरीक्षक सुखचैन सिंग गिल म्हणाले की, खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याला अटक करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सुखचैन सिंग गिल म्हणाले की, आम्हाला इतर राज्ये आणि केंद्रीय यंत्रणांकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे.

अटक करण्याचा प्रयत्न :पंजाब सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने सांगितले की, अद्याप फरार असलेल्या अमृतपाल सिंग याच्याविरोधात लुकआउट सर्कुलर आणि अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. पंजाब पोलीस सर्व यंत्रणांच्या मदतीने त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. पंजाब पोलिसांनी मंगळवारी फरारी खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांची अनेक छायाचित्रे प्रसिद्ध केली. पंजाबचे पोलीस महानिरीक्षक सुखचैन सिंग यांनी सांगितले की, अमृतपाल सिंगचे वेगवेगळ्या पोशाखात अनेक छायाचित्रे आहेत.

154 जणांना अटक :अमृतपाल सिंग दुसऱ्या राज्यात पळून गेला होता का, या प्रश्नावर पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात तो नांगल अंबियन येथील गुरुद्वारा साहिबमध्ये पळून गेला होता. जिथे त्याने कपडे बदलले. दोन मोटारसायकलस्वारांनी त्याला पळून जाण्यास मदत केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पंजाब पोलिसांच्या अनेक पथके या प्रकरणी काम करत आहेत. ते म्हणाले की, आतापर्यंत 154 जणांना अटक करण्यात आली आहे. रायफल आणि रिव्हॉल्व्हरसह 12 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

सीसीटीव्ही फुटेज : प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांत क्लीन शेव्हही दिसत आहे. गिल म्हणाले की, आम्ही ही सर्व छायाचित्रे प्रसिद्ध करत आहोत. जनतेला आवाहन करून ते म्हणाले की, हे चित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे आणि पोलिसांना मदत करावी. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो जालंधर येथील एका गुरुद्वारात गेला. तेथे कपडे बदलून मोटारसायकलवरून पळून गेला. अमृतपाल सिंग शेवटचा 18 मार्च रोजी एसयूव्हीमधून पळून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता. तो अद्याप फरार आहे.

Amritpal Singh: पंजाब पोलिसांचा मोठा खुलासा, अमृतपाल सिंग वेगळा वेश परिधान करून फरार

ABOUT THE AUTHOR

...view details