पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या भेटीत राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेत विविध विषयावर चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अबुधाबीसाठी रवाना झाले. मात्र फ्रान्समधून रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांचे मित्र तथा राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सेल्फी घेतला. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी हा फोटो फ्रेंच, इंग्रजी आणि हिंदीमध्ये कॅप्शनसह ट्विटरवर शेअर केला. भारत आणि फ्रान्समधील मैत्री अजरामर असल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लिहिले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या ट्विटला उत्तर देत फ्रेंड्स फॉरएव्हर असे लिहिले आहे. त्यामुळे भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशातील मैत्री व्यक्त होत आहे.
दोन्ही देशासाठी ही भेट खूप फलदायी ठरली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सची भेट खूप फलदायी ठरल्याचे यावेळी स्पष्ट केले. ग्रीन हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, एआय आणि सेमीकंडक्टरसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याची अपेक्षा असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 'माझे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी झालेली बातचीत खूप फलदायी ठरली. आम्ही भारत-फ्रान्स संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा आढावा घेतला. ग्रीन हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, एआय यांसारख्या भविष्यातील क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी विशेषतः मी उत्साहित आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.