सिकंदराबाद (तेलंगणा)- निवार चक्रीवादळाचा रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. तिरुअनंतपुरम ते कोरबा आणि अहमदाबाद ते चेन्नई या दोन लांब पल्ल्याच्या मार्गांवरील गाड्या शुक्रवारी दुसऱ्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टी भाग निवार चक्रीवादळाने बाधित झाला आहे. त्यामुळे दोन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याचे रेल्वे झोनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.