नवी दिल्ली -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Met Shivsena MP ) यांनी काल दिल्लीत शिवसेनेच्या (शिंदे गट) 12 खासदारांची भेट घेतली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाच्या १९ पैकी १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र सादर केले. त्यात त्यांनी १२ खासदारांचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली. लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटांच्या खासदारांची मागणी मान्य केली. तर शिवसेना सभागृह नेतेपदी राहुल शेवाळे यांची निवड केली आहे. तर भावना गवळी यांना मुख्य व्हीप म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
Speaker Approves Shinde Group दिल्लीला येण्याचे कारण - दिल्लीला येण्याची दोन कारणे होती असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. एक तर खासदारांच्या समर्थनाचे पत्र आणि दुसरे म्हणजे ओबीसी आरक्षणासंबंधी वकिलांची भेट असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते शेवाळे, मुख्यप्रतोद भावना गवळी, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावीत, श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
शिवसेना गटाच्या मागणीला दिली मान्यता - शिवसेनेच्या शिंदे गटाची सभागृह नेता बदलण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल मान्य केली. आता शिवसेनेचे सभागृह नेते राहुल शेवाळे असतील. तर, भावना गवळी यांना मुख्य व्हीप म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटात सामील झालेल्या १२ खासदारांनी मंगळवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना याबाबत पत्र सादर केले. दरम्यान,
लोकसभा अध्यक्षांना पत्र - महाराष्ट्रातल्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. अडीच वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होते आता झाले आहे, जनतेच्या मनातल्या सरकार आम्ही स्थापन केले आहे. ओबीसी आरक्षणबाबत वकिलांशी चर्चा आज आम्ही केली आहे. केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पाठिंबा देत आहे. मदतीबाबत कोणतीही काटकसर होणार नाही, असे आश्वासन गृहमंत्री व पंतप्रधानांना दिलेले आहे. याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. बारा खासदारांनी बाळासाहेबांच्या विचारांचे स्वागत केले आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा स्पीकरला तसे पत्र दिले आहे. सभापती ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांना लोकसभेतील शिवसेना नेते म्हणून मान्यता दिली आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांसाठी जेवढे चांगले काम करता येईल ते काम करत आहोत. लोकांचे सरकार कुठेही कमी पडणार नाही असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार शेवाळे यांनी दिली आहे.
हेही वाचा -Rahul Shewale : उद्धव ठाकरे भाजपासोबत युतीसाठी तयार होते पण...; खासदार शेवाळेंचा गौप्यस्फोट