नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिस्थितीवर पंतप्रधान मोदी लक्ष ठेवून आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवावा. तसेच लॉकडाउन टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ -
देशातील नागरिकांना जो त्रास होत आहे. त्याची मला पूर्ण कल्पना आहे. अनेकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी तुमच्या दुखा:त सहभागी असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटले. आज देश पुन्हा कोरोनाविरूद्ध एक मोठी लढाई लढत आहे. काही दिवसांपूर्वी परिस्थिती स्थिर होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. कोरोनाचे हे आव्हानाला आपल्याला धैर्याने सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी म्हटले.