नवी दिल्ली : स्थानिक कारागिरांची उत्पादने आता विमानतळांवर विकली जाणार आहेत. यासाठी AAI (Airports Authority of India) ने स्वयं-सहायता गटांशी भागीदारी केली आहे. अवसर उपक्रमांतर्गत देशातील १२ विमानतळांवर यापूर्वीच कुशल कारागिरांच्या उत्पादनांची विक्री करण्यात येत ( Participation of AAI with Self Help Groups ) आहे. त्यामध्ये आगरतळा, कुशीनगर, उदयपूर आणि मदुराई विमानतळ आदी विमानतळाचा समावेश आहे.
AAI ने सांगितले की, वाराणसी, कालिकत, कोलकाता, कोईम्बतूर आणि रायपूरसह इतर अनेक शहरांच्या विमानतळांना संबंधित राज्य सरकारांच्या समन्वयाने स्थानिक गटांना उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा दिली जाईल. विशाखापट्टणम, भुवनेश्वर, रायपूर, सिलचर, दिब्रुगड आणि जोरहाट या विमानतळांवरही स्थानिक गटांना सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.