लंडन -लिझ ट्रसयांची नवीन ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली Liz Truss New British Prime Minister आहे. सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यानंतर नवीन नेत्याची निवड करण्यासाठी सहा आठवडे ही मोहीम चालली होती. आज लिझ ट्रस यांची निवड करण्यात आली आहे. या लढतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिझ ट्रस एकमेकांशी स्पर्धा करत होते. सोमवारी विजेत्याची घोषणा सर ग्रॅहम ब्रॅडी यांनी केली.
ऋषी सुनक यांचा पराभवकेल्यानंतर आता लिझ ट्रस ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची जागा घेतील. थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर 47 वर्षीय लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान होणार आहेत. लिझ ट्रस मंगळवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लिझ ट्रस यांना 81,326 आणि ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली. पंतप्रधान निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपले. निवडणूक निकालापूर्वी आलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणात ऋषी सुनक हे लिझ ट्रस यांच्या मागे असल्याचे सांगण्यात आले होते. लिझ ट्रस यांनी सर्व कंझर्व्हेटिव्ह सदस्यांच्या पोस्टल बॅलेटद्वारे सुनक यांचा पराभव केला.
कंझर्व्हेटिव्ह पक्षाची नेता म्हणून निवडून आल्याचा मला सन्मान वाटतो. आमच्या महान देशाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. या कठीण काळात आपल्या सर्वांना मदत करण्यासाठी, आपली अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन आणि युनायटेड किंगडमची क्षमता सिद्ध करेन, असे निकाल जाहीर झाल्यानंतर ट्रस यांनी ट्विट केले.