महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 13, 2021, 5:08 PM IST

ETV Bharat / bharat

यूपीत मारहाणीचे चित्रीकरण करताना युवकाला लागली गोळी, VIDEO व्हायरल

उत्तर प्रदेशच्या संभलमधील एका हत्येचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे. गल्लीतील मारहाणीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या एका युवकाला गोळी लागल्यानंतर तो जखमी झाल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसते. विशेष म्हणजे गोळी लागल्यानंतरही हा युवक मोबाईलमधून चित्रीकरण सुरू ठेवतो. दरम्यान, दुर्दैवाने या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना बहजोई ठाणे हद्दीतील सिसौना गावात घडली आहे.

यूपीत मारहाणीचे चित्रीकरण करताना युवकाला लागली गोळी, VIDEO व्हायरल
यूपीत मारहाणीचे चित्रीकरण करताना युवकाला लागली गोळी, VIDEO व्हायरल

संभलः उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये मारहाणीचे चित्रीकरण करणाऱ्या एका युवकाला गोळी लागल्याचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गोळी लागल्यानंतर जखमी अवस्थेतही हा युवक चित्रीकरण सुरू ठेवतो आणि बोलताना दिसतो. दरम्यान, घटनेनंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना या युवकाचा सोमवारी दुर्दैवी मत्यू झाला आहे.

यूपीत मारहाणीचे चित्रीकरण करताना युवकाला लागली गोळी, VIDEO व्हायरल

व्हिडिओ चित्रीकरण करतानाच लागली गोळी

जिल्ह्यातील बहजोई ठाणे हद्दीतील सिसौना गावात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीसंदर्भातील वादातून दोन गटांत सुरू असलेल्या मारहाणीचे चित्रीकरण हा युवक घराच्या छतावरून करत होता. यादरम्यानच त्याला गोळी लागते आणि तो जोरजोरात ओरडण्यास सुरूवात करतो. विशेष म्हणजे यानंतरही तो चित्रीकरण सुरूच ठेवतो आणि गोळी मारणाऱ्याचे नाव घेताना या व्हिडिओत स्पष्ट दिसते. यानंतर तो छतावरच कोसळतो आणि मदतीची मागणी करत असल्याचे या व्हिडिओत दिसते. दरम्यान, या घटनेत आणखी एका व्यक्तीचा गोळी लागून जागेवरच मृत्यूही झाला आहे.

शनिवारी सायंकाळी घडली घटना

सिसौना गावात शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास निवडणुकीसंदर्भातील वादातून एका गटाने दुसऱ्या गटावर अचानक हल्ला केला. यादरम्यान दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी आणि गोळीबाराला सुरूवात झाली. यादरम्यान रस्त्यावरून जात असलेल्या नवरत्नला गोळी लागली. तर घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या शिवा यालाही गोळी लागली. याशिवाय गावातील खासगी शाळेचे शिक्षक किरण पाल हेही गोळी लागल्याने जखमी झाले. घटनेनंतर तिन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात नवरत्नला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर जखमी शिवाचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. तर शिक्षक किरण पाल यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून व्हायरल व्हिडिओची तपासणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -सूरत : जामिनानंतर दारूमाफियाने काढली महागड्या गाड्यांची रॅली; व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details