अहमदाबाद - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढतच आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत आहे. यात लहान बालकांनाही कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणात होत आहे. गुजरातमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 411 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात नवजात बालकांपासून 12 वर्षांच्या बालकांचा समावेश आहे.
गुजरातमध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. दिवसेंदिवस गंभीर रुग्णसंख्येत भर पडत आहे. त्यात काही बालकांचा समावेश असून, त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ही बालके कोरोनावर मात करून ठणठणीत बरे झाले आहेत. यामध्ये एका 25 दिवसाच्या बालकाचाही समावेश आहे. त्या चिमुकल्याने उपचार घेऊन कोरोना विरुद्ध यशस्वी लढा देत मात केली आहे.
आईचे दूधही पाजले नाही-
सुरत शहरात एका 25 दिवसाच्या नवजात बालकाने कोरोनाला हरवले आहे. त्या बालकाचे वडील रुबेन डॅनियल यांना कोरोना झाला होता. त्यानंतर दोन दिवसात त्यांची आई आणि पत्नीही कोरोना संक्रमित झाले. परिणामी त्यांच्या संपर्कात असलेल्या नवजात बालकालाही कोरोनाने घेरले. आईला कोरोना झाला असल्याने त्या बालकाला दूध पाजले नाही. मात्र नियमाचे पालन आणि योग्य उपचरांती त्या बालकास कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश मिळाले. त्यामुळे ते बालक आता सुरक्षित आहे. अशाच प्रकारे अनेक बालकांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.
माझा मुलगा झुंझार आहे-
शिवेन शाह हा तीन वर्षाचा मुलगा देखील कोरोनाबाधित झाला होता. त्याने देखील कोरोनावर मात केली आहे. याबाबत त्याचे वडील मृगेश शाह म्हणाले की, जेव्हा माझा मुलगा कोरोनाबाधित झाला , त्यावेळी त्याला विलगिकरणात ठेवण्यात आले. तत्काळ योग्य ते उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर तो एकदम ठणठणीत झाला आहे, तो एक झुंजार मुलगा असल्याची भावना शाह यांनी व्यक्त केली.
तापाने फणफणत होती चिमुकली