नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' च्या 102 व्या आवृत्तीला संबोधित करत आहेत. अमेरिका दौरा करणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी मी ‘मन की बात’ वेळेआधी करत आहेत. मन की बात कार्यक्रम सुरु करण्याआधी पंतप्रधान मोदींनी कार्यक्रम वेळेआधी का करण्यात येत हेही सांगितले. त्यानंतर मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. पीएम मोदी म्हणाले की, 'मन की बात' साधारणपणे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी तुमच्यापर्यंत पोहोचत असते. पण यावेळी ती एक आठवडा आधी पोहोचणार आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे की, मी पुढच्या आठवड्यात अमेरिकेत आहे आणि तिथले वेळापत्रक खूप व्यस्त असेल. म्हणून मी जाण्यापूर्वी तुमच्याशी गप्पा मारण्यापेक्षा चांगला मार्ग कोणता, असा विचार केला आणि तुमच्याशी मन की बात करत आहे.
कच्छच्या नागरिकांचे कौतुक :संबोधन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही लोक म्हणतात की मी पंतप्रधानाच्या रुपाने खूप चांगले काम केले. किंवा काही महान कार्य केले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आलेल्या पत्र वाचतात. त्यांचे कौतुक करतात. तसेच चांगल्या कामांचे कौतुक करतात. पंतप्रधान मोदींनी चक्रीवादळ बिपरजॉयपासून वाचण्यासाठी कच्छच्या लोकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, दोन-तीन दिवसांपूर्वीच देशाच्या पश्चिम भागात किती मोठे चक्रीवादळ आले ते आम्ही पाहिले... जोरदार वारे, मुसळधार पाऊस. बिपरजॉय चक्रीवादळामुळे कच्छमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. पण कच्छच्या लोकांनी ज्या धाडसाने आणि तत्परतेने अशा धोकादायक चक्रीवादळाचा मुकाबला केला तो अभूतपूर्व आहे. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, दोन दशकांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर कच्छ कधीही सावरणार नाही असे म्हटले जात होते. आज हाच जिल्हा देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला विश्वास आहे की,कच्छचे लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून वेगाने बाहेर येतील. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात जलसंधारणावरही चर्चा केली. बांदा आणि बुदेलखंडमधील पाणीटंचाईचा त्यांनी उल्लेख केला.