पाटणा -बिहारमध्ये दारूबंदी ( Liquor Ban In Bihar ) लागू झाली आहे. असे असतानाही दारू तस्करीची प्रकरणे रोजच समोर येत आहेत. दारू तस्कर तस्करीसाठी आरोपी रोज नवनवीन युक्त्यांचा वापर करताना दिसतात. राजधानी पाटनामध्ये दारू तस्करीचा नवा जुगाड पाहायला मिळत आहे. घरातील तळघरात ठेवलेल्या स्वयंपाकघराच्या सिलिंडरमध्ये दारूचा साठा ( Liquor Smuggling In Patna ) केला जात आहे. या प्रकरणी पिरबहोर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली आहे.
पोलिसांनी सिलिंडरमधून आणण्यात येणारी देशी दारू जप्त केली आहे. देशी दारूची खेप सबलपूर डायरा येथून पाटण्याला आणली जात होती. पोलिसांनी सुमारे 50 लिटर देशी दारूचा साठा जप्त केला आहे. तसेच, या प्रकरणात एका तस्कराला अटक ( Liquor Smuggler Arrested In Patna ) करण्यात आली आहे.
पाटणामध्ये सिलिंडरमधून दारूची तस्करी - पीरबाहोर पोलिस स्टेशनचे प्रभारी सबीहुल हक यांनी सांगितले की, दारू माफियांची ही अनोखी पद्धत पाहून पोलिस दलही हैराण झाले. दारू तस्कर भूषण राय व दारू माफिया भोली राय यांच्या सांगण्यावरून, तळघरात सिलिंडरचा साठा करण्यात येत होता. देशी दारूचा साठा सबलपूर डायरा येथून पाटण्यापर्यंत बोटीने नेण्याचे काम करण्यात येत होते. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. भूषण राय याच्याकडून ५० लिटर देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.