प्रयागराज (उत्तर प्रदेश) : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमदचा मुलगा असद आणि गुलाम यांना गुरुवारी एसटीएफने चकमकीत ठार केले. दोघांच्या मृत्यूनंतर त्यांचा गुन्हेगारी इतिहास आणि त्यांचे छंद याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. माफिया वडील अतिक अहमद याच्याप्रमाणेच असदलाही महागड्या गाड्यांचा शौक होता. मात्र आता असद याची करोडो रुपयांची टोयोटा लँड क्रूझर कार त्याच्या घरामागील टिन शेड गॅरेजमध्ये धूळ खात उभी आहे.
कारची किंमत 2 कोटींहून अधिक : एकेकाळी बाहुबली अतिक अहमदला महागड्या गाड्यांसोबतच महागडी शस्त्रे, घोडे आणि कुत्रे यांचाही शौक होता. वडिलांच्या मार्गावर चालणारा मुलगा असद यालाही असेच खूप महागडे छंद होते. असदला महागड्या बाइक्स आणि कारचा शौक होता. अनेकदा बाजारात जी कोणती नवीन गाडी यायची, ती काही दिवसांतच त्याच्या गॅरेजमध्ये दिसायची. अतिक अहमद हा आपला छंद जोपासण्यासाठी महागड्या गाड्या खरेदी करत असे. त्याचा मुलगा असद यालाही अशाच प्रकारचा छंद होता. त्याने एक टोयोटा लँड क्रूझर कार खरेदी केली होती. या कारची किंमत तब्बल 2 कोटींहून अधिक आहे.