बोकारो ( झारखंड ) : जिल्ह्यात शनिवारी मोठी दुर्घटना घडली. जैनमोड येथील बांधडीह या माध्यमिक विद्यालयात ( Middle School Bandhdih in Bokaro ) शनिवारी दुपारी वीज ( Lightning struck the school ) पडली. शाळेच्या व्हरांड्यात वीज कोसळल्याने सुमारे 30 विद्यार्थी भाजून जखमी झाले ( 30 Students Injured In Lightning ) आहेत. भाजलेल्या मुलांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे. गंभीर अवस्थेत जळालेल्या डोली या चौथीच्या विद्यार्थिनीला बोकारो सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. बोकारोचे सिव्हिल सर्जन डॉ. अभय भूषण प्रसाद यांनी माहितीवरून हॉस्पिटल गाठले. त्यांनी सांगितले की, एक मुलगी गंभीर आहे, बाकीच्या घाबरल्या आहेत. मात्र सर्वांवर डॉक्टरांनी उपचार केले आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक शशी महतो यांनी सांगितले की, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हलका पाऊस पडत होता. दरम्यान, व्हरांड्यात इयत्ता एक आणि दोनचे वर्ग सुरू होते. त्यानंतर व्हरांड्यात वीज पडली. या अपघातात तेथे शिकणारी मुले जखमी झाली. त्यामुळे भीतीने आरडाओरडा झाला. घाईघाईत लोकांनी मुलांना जैनमोड सदर रुग्णालयात नेले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली. या घटनेत 25 ते 30 मुले भाजल्याची माहिती मुख्याध्यापक शशी भूषण महतो यांनी दिली. तर चौथीच्या वर्गातील मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.