महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 14, 2020, 9:56 AM IST

ETV Bharat / bharat

लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आयएमएचे नवे कमांडंट

लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आयएमएचे नवे कमांडंट झाले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.

Lieutenant General Harvinder Singh
लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग

देहरादून - लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी शुक्रवारी प्रतिष्ठित भारतीय सैन्य अकादमीचे कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर लेफ्टनंट जनरल सिंग यांनी शहीद स्मारकात देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

आयएमए अधिकाऱ्यांनी सांगितले की, जनरल सिंह यांनी मेजर जनरल जे.एस. मंगत यांच्याकडून अकादमीची कमान घेतली. ले. जनरल जयवीर सिंह नेगी यांच्या सेवानिवृत्तीनंतर 30 सप्टेंबर 2020 पासून मेजर जनरल जे.एस. मंगत कार्यकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

दोन वेगवेगळ्या ब्रिगेडला कमांडिंग करण्याचा अनुभव -

ले. जनरल हरिंदर सिंग एनडीए खडकवासला येथून पासआउट झालेले आहेत. अकादमी सोडताच ते नऊ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यान्वित झाले. मराठा लाईट इन्फंट्री सैन्याच्या सर्वात जुन्या रेजिमेंट्सपैकी एक आहे. नंतर त्यांच्यावर कुपवाडा सेक्टरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये राष्ट्रीय रायफल्सची जबाबदारी आली. लेफ्टनंट जनरल सिंग यांच्याकडे दोन वेगवेगळ्या ब्रिगेडला कमांडिंग करण्याचा अनुभव आहे.

जनरल हरिंदर सिंग पूर्व कॉंगोमध्ये तैनात केलेल्या यू.एन. मधील प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय ब्रिगेड आणि काश्मीरमधील सीमावर्ती भागात सैन्य दलात कमांडर होते. लेफ्टनंट जनरल सिंग हे आयएमए देहरादून आणि इन्फंट्री स्कूलमध्ये प्रशिक्षकही राहिले आहेत. तसेच त्यांनी युनायटेड नेशन्स मिशनमध्ये अंगोला येथे काम केले.

हेही वाचा-दिवाळीला एक दिवा सीमेवरील जवानांसाठी लावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासीयांना आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details