मुंबई: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (LIC) आज त्यांचे शेअर्स बाजारात उतरवले आहेत. एलआयसीचे शेअर्स ( LIC Shares ) आज शेअर बाजारात लिस्ट करण्यात आले. सोमवारी ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या शेअर्समध्ये किंचित सूट देण्यात आली, ज्यामुळे शेअर्स त्यांच्या इश्यू किमतीच्या खाली सूचीबद्ध करण्यात आले आहेत. याचा अर्थ एलआयसीच्या शेअरची किंमत 949 रुपये ( LIC Share Price ) किंवा त्याहून कमी इश्यू किंमतीच्या आसपास स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पहिल्याच दिवशी ठरवलेल्या किमतीपेक्षा कमी म्हणजेच ९०० च्या आसपास किंमत या शेअर्सना मिळाली आहे.
ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या शेअर्सवर प्रति शेअर 15 ते 20 रुपये सूटवर बोली लावण्यात आली होती. ग्रे मार्केट हे एक अनधिकृत बाजार आहे, जिथून मिळालेला डेटा ट्रेंड अंदाजासाठी वापरला जातो. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे LIC शेअर्सच्या ग्रे मार्केट प्रीमियममध्ये मोठी घसरण ( Big drop in gray market premiums ) झाली आहे. एलआयसीच्या शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम त्याच्या शिखरावर होता 95 रुपये प्रति शेअर. सरकारने एलआयसीच्या शेअर्सची इश्यू किंमत 949 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. तथापि, एलआयसी पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणूकदारांना अनुक्रमे 889 रुपये आणि 904 रुपये प्रति शेअर दराने शेअर्स मिळतील.