मुंबई -देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीमागील शेअर बाजारातील अडचणी दूर होताना दिसत नाही. एलआयसी कंपनी बाजारात लिस्टिंग झाल्यापासून त्याच्या मागे घसरणीचे सत्र सुरू आहे. मागील 14 ट्रेडिंग सत्रात एलआयसीचे बाजार भांडवल 94 हजार कोटींपेक्षा कमी झाले आहे.
मागील आठवड्यात एलआयसीच्या शेअर दराने शुक्रवारी 800.05 रुपये इतका दर गाठला. हा एलआयसीचा नीचांक आहे. बाजारात लिस्ट झाल्यानंतर एलआयसीचा शेअर दर 7.72 टक्के म्हणजे 67 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 5 लाख सहा हजार 126 कोटी रुपयांवर आला आहे. आयपीओनुसार अप्पर बँण्डच्या हिशोबाने एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 6 लाख 242 कोटी रुपये होते. म्हणजेच एलआयसीच्या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना 94,116 कोटींचा फटका बसला आहे.
ब्रोकरेज फर्मने दिला इतका टार्गेट प्राइस -या दरम्यान, ब्रोकरेज फर्म ( Emkay Global ) ने एलआयसीसाठी टार्गेट प्राइस दिली आहे. फर्मने एलआयसीला होल्ड रेटिंगसह 875 रुपयांचे टार्गेट प्राइस दिले आहे. ( Emkay Global ) ने दिलेल्या टार्गेट प्राइसनंतरही आयपीओ गुंतवणुकदारांना फारसा फायदा होणार नाही. ब्रोकरेज फर्मने एलआयसीला हत्ती संबोधत हत्तीकडून नृत्याची अपेक्षा करू नये असे म्हटले होते.