नवी दिल्ली:LG orders recovery: दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवांना आम आदमी पक्षाकडून Aam Aadmi Party जाहिरातीवर खर्च केलेल्या व्याजासह 97.14 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले recovery of Rs 97 crore आहेत. 2016 मध्ये आम आदमी पार्टीची सत्ता असलेल्या दिल्ली सरकारने जाहिरातींवर सरकारी पैसा खर्च केल्याची तक्रार आली होती, त्यानंतर उपराज्यपालांनी चौकशीचे आदेश दिले होते. हे प्रकरण न्यायालयात गेले, परंतु न्यायालयानेही सरकारी पैशाच्या गैरवापराबद्दल सांगितले आणि ही रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश 'आप'ला दिले.
न्यायालयाच्या आदेशाचा दाखला:न्यायालयाच्या त्या आदेशाचा दाखला देत नायब राज्यपालांनी दिल्ली सरकारचे मुख्य सचिव नरेश कुमार यांना आम आदमी पक्षाकडून एका महिन्यात रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेस नेते अजय माकन यांनी सर्वप्रथम जाहिरातीतील सरकारी निधीच्या बेकायदेशीर वापराबाबत तक्रार केली होती. ज्यामध्ये दिल्ली सरकारने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला जनतेमध्ये प्रोजेक्ट करण्यासाठी सरकारी पैशाच्या जाहिरातींमध्ये करोडो रुपये पाण्यासारखे खर्च केले आहेत.