महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mangalagaur 2022 जाणून घेऊया मंगळागौरची माहिती व पूजाविधी - श्रावण महिना

ऑगस्ट August महिना सुरू होताच व्रत आणि सणांची रेलचेल सुरू होते. मंगळागौरी Mangalagaur पुत्रदा Putrada आणि भागवत एकादशी Bhagwat Ekadashi असे अनेक व्रत या महीन्यात येतात. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला Shravan Month खूप महत्त्व असते. हा महिना खूप पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यातील दर मंळवारी मंगळागौरीचे व्रत करून आनंद साजरा केला information and puja rituals जातो. असे म्हणतात की, नवविवाहित महिला लग्नानंतर श्रावण महीन्यातील प्रत्येक मंगळवारी पाच वर्ष हे व्रत करतात.

Mangalagaur 2022
मंगळागौरची माहीती व पुजाविधी

By

Published : Aug 16, 2022, 3:01 AM IST

मुंबई ऑगस्ट August महिना सुरू होताच व्रत आणि सणांची रेलचेल सुरू होते. मंगळागौरी Mangalagaur पुत्रदा Putrada आणि भागवत एकादशी Bhagwat Ekadashi असे अनेक व्रत या महीन्यात येतात. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व असते. हा महिना खूप पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यातील Shravan Month दर मंळवारी मंगळागौरीचे व्रत करून आनंद साजरा केला information and puja rituals जातो. असे म्हणतात की, नवविवाहित महिला लग्नानंतर श्रावण महीन्यातील प्रत्येक मंगळवारी पाच वर्ष हे व्रत करतात.


कशी साजरी करतात मंगळागौरीहिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व असते. हा महिना खूप पवित्र मानला जातो. या महिन्यात दर मंगळवारी मंगळगौर साजरी केली जाते. यावेळी पूजनाचा घाट घातला जातो. मंगळागौरीची Mangala Gauri नवविवाहित महिलांमध्ये वेगळीच क्रेझ असते. नवीन लग्न झाल्यानंतर 5 वर्ष ही मंगळगौर खेळण्याची प्रथा असते. मंगळागौरीच्या दिवशी सार्‍या महिला एकत्र जमतात आणि रात्र जागवतात. रात्र जागवून खेळ खेळण्याची प्रथा असते.


यंदा मंगळागौरी पूजनाचे Mangala Gauri Puja कोणकोणते दिवस आहेत ते जाणून घेऊया.

यंदाच्या श्रावण महिन्यात मंगळागौर पूजन 2 ऑगस्ट, 9 ऑगस्ट, 16 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट दिवशी केले जाणार आहे. या दिवशी देवी पार्वतीची पुजा करतात. अखंड सौभाग्य आणि सासर माहेरास सुखसमृद्धी लाभावी यासाठी रात्रभर जागून हे व्रत केले जाते. नवविवाहितेच्या वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण व्हावे. अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभावी म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची प्रथा आहे. लग्नानंतर आईने मुलीला दिलेले सौभाग्याचे व्रत म्हणून मंगळागौरीला विशेष महत्त्व असल्याचे म्हटले जाते.

खेळ खेळण्याची प्रथामंगळागौर पूजनावेळी आपले नातेमंडळी शेजारी आजूबाजूच्या ओळखीतील स्त्रीया व मुलांना बोलावले जाते. त्यानंतर पूजा करून फुगडी व बसफुगडी आणि झिम्मा असे विविध पारंपारिक खेळ खेळून रात्र जागवली जाते असे म्हणतात.

मंगळागौर पूजा विधी या दिवशी सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते. त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती बहुधा अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची स्थापणा करण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. मंगळागौरीची षोडषोपचारपूजा करतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाशीनींचे भोजन होते. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते.

हेही वाचाGanesh festival गणेशोत्सवासाठी उंच मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग

ABOUT THE AUTHOR

...view details