महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 19, 2022, 7:09 AM IST

Updated : Sep 19, 2022, 9:30 AM IST

ETV Bharat / bharat

Todays Top News : देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर....

जाणून घ्या आज काय असेल खास, दिवसभर या बातम्यांवर ( Todays Top News ) राहाणार लक्ष. देशात काय घडणार आहे, क्रीडा आणि राजकारण हे विशेष. पहा एका क्लिकवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. (the important events of the country in one click)

Todays Top News
Todays Top News

चंदीगड विद्यापीठ व्हिडिओ प्रकरण : आरोपी तरुण, त्याच्या भावाला हिमाचल पोलिसांनी ताब्यात घेतले, पंजाब पोलिस काही वेळात पोहोचतील

मोहालीतील एका खासगी विद्यापीठात आंघोळ करताना विद्यार्थिनींचा व्हिडिओ लीक केल्याप्रकरणी आरोपी विद्यार्थ्याच्या कथित प्रियकराला शिमला येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस मुलाची चौकशी करत आहेत. वाढता गोंधळ पाहून विद्यापीठ प्रशासनाने 2 दिवस (19 आणि 20 सप्टेंबर) काँलेज बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

संजय राऊतां यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल.

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नेते संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपतेय. त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. तसेच त्यांनी दखल केलेल्या जामीन अर्जावरही आजपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

राज्यातील 547 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी

राज्यातील १६ जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुका काल पार पडल्या. त्यातील 61 जागा बिनविरोध निवडून आल्या. पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरु होई

उस्मानाबादच्या कळंबमध्ये आज मराठा आरक्षण मोर्चा

कळंबमधील विद्याभवन हायस्कूल ते तहसील कार्यालय या मार्गावर सकाळी ११ वाजता मराठा आरक्षण मोर्चा निघणार आहे.

Akhilesh Yadav Paidal March: आजपासून उत्तर प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या विशेष प्रसंगी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी राज्यातील भाजप सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. ते आज भाजपच्या विरोधात आपल्या सर्व विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांसह सपा कार्यालय ते विधानसभेपर्यंत पायी कूच करणार आहेत.

चित्ता : 5-10 वर्षांत प्रोजेक्ट चीताचे परिणाम समोर येतील

लॉरी मार्कर, जगातील अग्रगण्य चित्ता तज्ञ आहेत. त्या म्हणातत की स्था येत्या काही वर्षांत भारताला आणखी चित्ते मिळतील. हे चित्ते नामिबिया, दक्षिण आफ्रिकेतून आणले जाणार आहेत. तसेच भारताच्या चीता प्रकल्पाचे परिणाम येत्या ५ ते १० वर्षांत दिसून येतील.

पालघरमधील साधू हत्येच्या तपासाबाबत सुनावणी

पालघरमधील दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

राज ठाकरेंचा नागपूर, चंद्रपूर दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत ते आझ नेतेमंडळींच्या भेटी घेतील.

जाणून घ्या आज काय असेल खास, दिवसभर या बातम्यांवर ( Todays Top News ) राहाणार लक्ष. देशात काय घडणार आहे, क्रीडा आणि राजकारण हे विशेष. पहा एका क्लिकवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. (the important events of the country in one click)

Last Updated : Sep 19, 2022, 9:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details