काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज :
तिरुवनंतपुरम - केरळमध्ये काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा १९ दिवसांचा प्रवास रविवारी सकाळी राजधानी तिरुअनंतपुरमच्या परसाला भागातून सुरू झाला. केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष आणि खासदार के. सुधाकरन, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही डी साठेन आदि उपस्थित होते.
युद्धनौका तारागिरी : अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज असलेली युद्धनौका तारागिरी आज मुंबईतील माझगाव डॉक येथे दाखल होणार आहे.
भारतीय नौदलाचे तिसरे स्टेल्थ फ्रिगेट तारागिरी प्रकल्प 17A अंतर्गत तयार केले जात आहे. याला मुंबईस्थित Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) द्वारे लॉन्च केले जाईल. या युद्धनौकेत जवळपास ७५ टक्के स्वदेशी उपकरणे वापरण्यात आली आहेत. तारागिरी 10 सप्टेंबर 2020 पासून बांधली जात होती.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मरणार्थ आज भारतात राजकीय शोक
युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडच्या महाराणी एलिझाबेथ II यांचे गुरुवारी (8 सप्टेंबर 2022) निधन झाले. राणीच्या स्मरणार्थ, भारत सरकारने ११ सप्टेंबर रोजी देशभरात एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तराखंड: आज मुख्यमंत्री पुष्कर धामी पिथौरागढच्या आपत्तीग्रस्त भागाला भेट देणार
डेहराडून - मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी रविवारी, 11 सप्टेंबर रोजी पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला येथील रांडी (खोटीला) गावात आपत्तीग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतील. या दौऱ्यात मुख्यमंत्री आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री रविवारी सकाळी साडेदहा वाजता धारचुलाला पोहोचतील.
कर्नाल : शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा संघर्ष संपुष्टात, आज सकाळी महत्त्वाची बैठक