आज 'या' घडामोडींवर असणार नजर
राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, तुम्हाला पाहायला मिळतील ( Todays Top News ) एकाच क्लिकवर. आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल पाहा ( Top Headlines Today ) एका क्लिकवर.
सायरस मिस्त्री यांच्यावर होणार आज अंत्यसंस्कार : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला आहे. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. आज मंगळवारी सकाळी 10 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी लिझ यांना मिळणार ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान होण्याचा मान :ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची निवडणूक लिझ ट्रस यांनी जिंकली आहे. त्यांनी भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे. लिझ ट्रस मंगळवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लिझ ट्रस यांना 81,326 आणि ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली. थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत.
राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी आशिया कप 2022 आज रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना :यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध श्रीलंका सामना रंगणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील ४ सप्टेंबरचा भारत-पाकिस्तान सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. शेवटच्या षटकापर्यंत दोन्ही संघांमध्ये विजयासाठी संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, हा सामना अखेर पाकिस्तानने पाच गडी राखून जिकंला (Pakistan beats India by 6 wickets).
राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी शिवाजी पार्कचे मैदान शिवसेनेला मिळणार की शिंदे गटाला :आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच शिवसेनेप्रमाणे नवीन शिवसेना भवन बांधण्याचे नियोजन असतानाच शिंदे गटाने दसरा मेळावा आता शिवाजी पार्कवर घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शिवसेना चवताळून उठली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यावर परखड प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर मुंबई महापालिकेसाठी काय असणार भाजपची रणनीती :केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह यांनी मुंबई दौरा ( Amit Shah Mumbai visit ) केला. यावेळी त्यांनी शिवसेनेने २०१४ मध्ये दोन सीटसाठी युती Shiv Sena broke the alliance तोडली, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा असे वक्तव्य केले आहे. यावर जो काही कट रचला होता तो आता समोर येत आहे तो समोर येत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी हवामाना विभागाच्या अंदाजानुसार अजून काही दिवस असणार पाऊस :पुढील 3, 4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 व्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी हेही वाचा :Aditya Thackeray criticized Amit Shah जो कट रचला तो समोर येत आहे, आदित्य ठाकरेंची अमित शाह यांच्यावर टीका