Congress President Election : आजपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरता येणार
आजपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी 30 सप्टेंबरपर्यंत नामांकन अर्ज भरता येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शशी थरुर 30 तारखेला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे तर, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी नामांकन अर्ज भरला तरी ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
Aaditya Thackeray :आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत तळेगावात आंदोलन
फोक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने तळेगावात आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थितीत राहणार आहेत. तळेगाव एमआयडीसीसमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे.
Coronation ceremony :किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार
आज संभाजी ब्रिगेडकडून किल्ले रायगडावर द्वितीय शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याचे आयोजन करण्यात संभाजी ब्रिगेडने केले असून, मंत्री दादा भुसे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले, शंभूराज देसाई, उपस्थित राहण्याची माहिती मिळते आहे.
Punjab CM Met Rahul Gandhi : चन्नी भेटणार राहुल-सोनिया गांधींना, आज मंत्रिमंडळ घोषणा होण्याची शक्याता
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या सरकारमधील मंत्र्यांचा निर्णय आज नवी दिल्लीतील हायकमांड करणार आहे. यासंदर्भात पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फोनवरून चन्नी गुरुवारी संध्याकाळी दिल्लीत पोहोचले.
Rain with gale in Delhi : दिल्ली-एनसीआरमध्ये आज पावसाचा इशारा
दिल्ली-एनसीआरमध्ये आजही हवामान खात्याने अर्लट जारी केला आहे. काल दिल्लीत पावसाने अनेक भागात पाणी साचले होते.
Himachal Pradesh cabinet meeting today :आज मंत्रिमंडळाची बैठक, 27 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 27 सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय शुक्रवार, 24 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत घेतला जाऊ शकतो. राज्य सचिवालयात मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
Amit Shah : किशनगंज भाजपची चार वाजता बैठक
सीमांचल दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी दुपारी ४ वाजता पूर्णियाहून किशनगंजला पोहोचले. पूर्णिया येथील जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर गृहमंत्री विमानाने किशनगंजला रवाना झाले. अमित शाह पूर्वनियोजित कार्यक्रम घेऊन किशनगंज येथील माता गुजरी विद्यापीठात पोहोचतील. जिथे चार वाजता ते बिहार भाजपचे खासदार, आमदार आणि माजी मंत्र्यांची बैठक घेणार आहेत.
Prime Minister Modi : आज हिमाचल प्रदेशातील मंडी येथे 'युवा परिषदे'ला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचलमधील मंडी येथे 'युवा परिषदे'ला संबोधित करणार आहेत. भाजप युवा मोर्चातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत राज्यभरातून १ लाख तरुण सहभागी होणार आहेत. यामध्ये 40 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती असणार नाही.
Parambir Singh :परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या वसुलीच्या आणखी एका गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आणि त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.