पानिपत (हरियाणा): प्रेमात पडलेला व्यक्ती काहीही करू शकतो असं म्हटलं जातं. आता अशीच एक घटना हरियाणातील पानिपतमधून समोर आली आहे. या घटनेत दोन मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या आहेत. या दोन मुली लिंग बदल शस्त्रक्रिया करून लग्न करण्याच्या तयारीत आहेत. दोघींच्या लग्नाला घरच्यांकडून विरोध होत असला तरी हा विरोध झुगारून लग्नगाठ बांधण्याची तयारी त्यांनी सुरु केल्याने हा चर्चेचा विषय होत आहे.
ज्युनिअर मुलगी होणार सिनिअरचा नवरा:पानिपतमधून एक विचित्र प्रेम प्रकरण समोर आले आहे. हे प्रेम प्रकरण दोन विद्यार्थिनींचे आहे. फक्त 20 वर्षांची एक सिनियर तिच्या ज्युनिअर असलेल्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडली. दरम्यान, दोघांची जवळीक खूपच वाढली. दोघीही दूरच्या नातेवाईक असल्याचेही सांगितले जात आहे. दोघीही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकत आहेत. आता ज्युनियर विद्यार्थिनी तिचे लिंग बदलून तिच्या सिनियरचा नवरा होणार असल्याचे समजते.
नातेवाईकांचा या निर्णयाला विरोध:याबाबत विद्यार्थिनींच्या नातेवाइकांना समजताच त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. ज्येष्ठ विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी आपल्या मुलीच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. कुटुंबीयांच्या आक्षेपावरून तिने तिच्याच आई-वडिलांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार केली आणि त्यांच्यापासून स्वतःला दूर केले आहे. त्या मुलीच्या वडिलांनी लेखी तक्रार दिली असून, आता आपले आपल्या मुलीशी कोणतेही नाते नसल्याचे सांगितले.